For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज

06:28 AM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अणुचाचणीसंबंधीच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह यांची टिप्पणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अणुचाचण्यांबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सीबीएसए नेटवर्कला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देश अजूनही अणुशस्त्रांची चाचणी करतात असे म्हटले होते. तथापि, अमेरिका असे करत नाही; आम्ही संयम बाळगत आहोत.’ असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या विधानामुळे दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आंतरराष्ट्रीय लक्ष आता भारत आणि पाकिस्तानच्या अणु धोरणांवर केंद्रित झाले आहे. तथापि, पाकिस्तानने हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे.

Advertisement

भाजप नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला उत्तर देताना भारत कोणत्याही परिस्थितीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे म्हटले आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अणुचाचण्या करू इच्छिणारा कोणताही देश तसे करू शकतो; आम्ही कोणालाही थांबवणार नाही. परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा भारत कोणत्याही आव्हानाला उत्तर देण्यास तयार असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच भारत देश अशा टिप्पण्या किंवा वृत्तांमुळे विचलित होणार नाही; आमचे धोरण संयम आणि तयारी या दोन्हींवर आधारित असल्याचेही ते पुढे म्हणाले होते. नियमांनुसार, 1998 च्या पोखरण चाचण्यांपासून भारताचे अणु धोरण प्रथम वापराच्या धोरणांचे पालन करत आहे. यानुसार, भारत कोणत्याही देशावर प्रथम अणुहल्ला करणार नाही, परंतु जर कोणी भारतावर हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असेही सांगण्यात आले.

ट्रम्प यांच्या दाव्यावर पाकिस्तानचे स्पष्टीकरण

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आरोपांनंतर, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानेही उत्तर जारी केले. पाकिस्तान एकतर्फी चाचणी-प्रेरणेच्या नियमाचे पालन करतो. आम्ही यापूर्वी कोणत्याही चाचण्या केल्या नाहीत आणि आताही करत नाही, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement
Tags :

.