For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत हा आमचा विश्वासार्ह भागीदार

06:58 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत हा आमचा विश्वासार्ह भागीदार
Advertisement

भारताच्या क्षमतेची अमेरिकेला योग्य जाणीव : राजदूत सर्जिओ गोर यांचे भाष्य

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला.  भारताला एक विश्वासार्ह भागीदार असे संबोधत अमेरिका भारताची क्षमता ओळखते आणि दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक मजबूत करू इच्छिते, असे गोर यांनी सांगितले. अमेरिका भारताला जगातील ‘सत्तेच्या केंद्रांपैकी’ एक मानते, असे सांगत गोर यांनी तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे आणि व्यापार या क्षेत्रांतील दोन्ही देशांमधील समान हितसंबंधांवर भर दिला.

Advertisement

ट्रम्प प्रशासन सत्तेची नवीन केंद्रे ओळखत आहे. भारताकडे असलेली क्षमता आम्ही ओळखतो. आम्ही भारताची प्रगती पाहत आहोत. आम्ही ही भागीदारी विस्तारत आणि मजबूत करत आहोत, असे सर्जिओ गोर म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याची आठवण करून दिली. गेल्यावर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला, तेव्हा दोन्ही देशांनी अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्यावर चर्चेत भर दिला होता, असे गोर म्हणाले. विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याला प्राधान्य देण्यावर एकमत झाले. महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील सहकार्यावरही भर देण्यात आला. यामध्ये संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम कंप्युटिंग, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा आणि अवकाश क्षेत्राचा समावेश होता, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले विश्वासू सहकारी सर्जिओ गोर यांची भारतासाठी अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केल्यापासून ते द्विपक्षीय संबंध पुनर्संचयित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. यापूर्वी, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनीही क्वाड बैठकीसाठी भारताला भेट दिली होती आणि संबंध सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून ते परतले होते.

Advertisement

.