महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानच्या स्थितीसाठी भारत जबाबदार नाही; नवाज शरीफ यांचा खुलासा

06:05 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवाज शरीफ यांचे प्रतिपादन : पाकिस्तानने स्वत:च्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

पाकिस्तानच्या वाईट स्थितीसाठी भारत, अफगाणिस्तान किंवा अमेरिका जबाबदार नाही. पाकिस्तानने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असल्याचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. सैन्याने 2018 च्या निवडणुकीत गैरप्रकार करून देशावर एक सरकार लादले होते. हेच सरकार नागरिकांच्या समस्या आणि देशाची आर्थिक स्थिती बिकट होण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे नवाज यांनी लाहोर येथील स्वत:च्या पक्षाच्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे.

देशाचे न्यायाधीश सैन्याच्या हुकुमशहांनी कायद्याचे उल्लंघन घेतल्यावर त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांचे स्वागत करतात. त्यांचे निर्णय योग्य ठरवितात, यानंतर याच हुकुमशहांच्या सांगण्यावरून पंतप्रधानपदावरून हटविण्यात येते, न्यायालयात न्यायाधीश संसद विसर्जित करण्याचा निर्णय देतात असे म्हणत नवाज यांनी न्यायपालिकेलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

सैन्यानेच मला पदावरून हटविले

1999 मध्ये एकेदिवशी सकाळी मी पंतप्रधान होतो. तर संध्याकाळ होईपर्यंत मला अपहरणकर्ते घोषित करण्यात आले. अशाचप्रकारे 2017 मध्ये स्वत:च्या मुलाकडून वेतन न घेतल्याप्रकरणी मला दोषी ठरवत पदावरून हटविण्यात आले. सैन्याने हा निर्णय स्वत:च्या पसंतीच्या  व्यक्तीला सत्तेवर आणण्यासाठी घेतला होता असे म्हणत नवाज यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात इम्रान खान यांच्यावरही निशाणा साधला आहे.

फैज हमीद यांचा हात

2017 मध्ये सत्तेवरून मला हटविण्यासाठी माजी आयएसआय प्रमुख जनरल फैज हमीद जबाबदार होते. नवाज तुरुगांतून बाहेर आल्यास आपली 2 वर्षांची मेहनत वाया जाईल असे फैज आणि इतर लोकांनी म्हटले होते. आता याच लोकांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक प्रकरण सुरू झाले असल्याचे नवाज म्हणाले.

कारगिल युद्धाला केला होता विरोध

नवाज शरीफ हे तीनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी भारतासोबतच्या संबंधांवरूनही वक्तव्य केले होते. 1999 मध्ये मी सैन्याच्या कारगिल प्लॅनला विरोध केला होता, याचमुळे मला पंतप्रधानपदावरून हटविण्यात आले होते. 1993 आणि 1999 मध्ये सत्तेवरून का हटविण्यात आले हे जाणून घेण्याचा मला अधिकार असल्याचे नवाज यांनी म्हटले होते. कारगिल प्लॅन योग्य नसल्याचे मी सांगितले होते. यावर तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनीच मला पदावरून हटविले. पुढील काळात माझे म्हणणे योग्य ठरले होते. आमच्या सरकारने प्रत्येक क्षेत्रात काम केले, माझ्या कार्यकाळादरम्यान भारताचे दोन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते असे नवाज यांनी नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article