महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक वाढीत भारत अधिक योगदान देण्यास समर्थ

06:09 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारत यावर्षी जागतिक विकासामध्ये 16 टक्क्यांपेक्षा जास्त योगदान देऊ शकतो. डिजिटलायझेशन आणि मूलभूत पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात आर्थिक सुधारणांमुळे भारताचा विकास दर मजबूत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ)भारताचे वर्णन ‘स्टार परफॉर्मर’ असे केले आहे.

Advertisement

आयएमएफचे सहाय्यक संचालक नादा चौईरी यांनी सांगितले की, ‘आम्ही काही काळापासून पाहात आहोत की भारत खूप मजबूत दराने वाढत आहे. जेव्हा आपण समवयस्क देशांकडे पाहतो आणि जेव्हा वास्तविक वाढीचा विचार करतो तेव्हा ते स्टार परफॉर्मर्सपैकी एक म्हणून दिसून येते. भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे’. असेही स्पष्ट केले. भारत जागतिक मंदीचा समर्थपणे सामना करत आहे. आयएमएफने म्हटले, ‘भारत या वर्षी जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.’

भारताची अर्थव्यवस्था मजबूत

आयएमएफने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारताची अर्थव्यवस्था कोरोना महामारीतून मजबूत झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, महागाई कमी झाली आहे आणि बजेट तूट कमी झाली आहे. मात्र, सार्वजनिक कर्जाचे प्रमाण जास्त आहे.

अनेक राज्यांमध्ये नोकरशाहीचे वर्चस्व

एका प्रश्नाला उत्तर देताना चौईरी म्हणाले की, गुंतवणूक आणि विकासासाठी राजकीय स्थैर्य महत्त्वाचे आहे. सरकारने व्यावसायिक वातावरणाला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, परंतु अनेक राज्यांमध्ये अजूनही बरीच नोकरशाही आणि लाल फितीचा कारभार आहे.

भारतात क्षमता

आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 6.3 टक्के आहे.दोन महिन्यांपूर्वी, 10 ऑक्टोबर रोजी, आयएमएफने आर्थिक वर्ष 2024 साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 6.1 टक्के वरून 6.3 टक्क्यांपर्यंत वाढवला होता.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article