अफगाण लोकांसाठी भारत सदैव प्रतिबद्ध
संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी अफगाणिस्तानच्या लोकांच्या समस्या आणि भारताची त्यांच्यासंबंधीची प्रतिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. अफगाणिस्तान हा सध्या दहशतवाद आणि नैसर्गिक आपत्तींना सामोरा जात आहे. अफगाणी लोकांसाठी भारत नेहमीच प्रतिबद्ध आहे. अफगाणिस्तान या देशाला आंतरराष्ट्रीय समर्थनाची आवश्यकता असल्याचे कंबोज यांनी सुरक्षा परिषदेत म्हटले आहे. तेथील लोकांचा मित्र म्हणून, अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य निश्चित करण्यात प्रत्यक्ष हिस्सेदारी बाळगणारा देश म्हणून सुरक्षा परिषदेसमोर आमची प्रतिबद्धता व्यक्त करतो असे कंबोज यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अफगाणिस्तानातील स्थिती अधिकच बिघडली आहे. पश्चिम अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात 320 हून अधिक जण मृत्युमुखी पडले होते तर शेकडो जण जखमी झाले होते. अफगाणिस्तानातील स्थिती अद्याप चिंतेचा विषय असल्याचे भारताने निदर्शनास आणून दिले आहे.