For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनमधील गूढ आजारामुळे भारतही सतर्क

06:40 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
चीनमधील गूढ आजारामुळे भारतही सतर्क
Advertisement

दक्षता वाढवण्याचे आरोग्य मंत्रालयाचे निर्देश : सर्व राज्यांना  विशेष सूचना जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनमध्ये न्यूमोनियाच्या वाढत्या ऊग्णांमुळे भारतातही चिंता वाढली आहे.  आरोग्यविषयक या धोक्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि ऊग्णालयांच्या तयारीच्या उपायांचे त्वरित पुनरावलोकन करण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Advertisement

अलिकडच्या आठवड्यात उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजारात वाढ झाल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने श्वासोच्छवासाच्या आजारांविऊद्धच्या तयारीच्या उपायांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचा इन्फ्लूएन्झा आणि थंडीचा हंगाम लक्षात घेता हे महत्त्वाचे मानले जाते. सध्या श्वसनाचे आजार वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रे पाठवून काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. संभाव्य आरोग्यविषयक धोक्याच्या पार्श्वभूमीवर ताबडतोब सार्वजनिक आरोग्य आणि ऊग्णालय सज्जता उपायांचे पुनरावलोकन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या वर्षाच्या सुऊवातीला शेअर केलेल्या ‘कोविड-19 च्या संदर्भात सुधारित पाळत ठेवण्याच्या रणनीतीसाठी ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे’ लागू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषत: लहान मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांचे बारकाईने निरीक्षण करण्याची सूचना करण्यात आली आहे. एचआर, हॉस्पिटल बेड्स, इन्फ्लूएन्झासाठी औषधे आणि लस, वैद्यकीय ऑक्सिजन, प्रतिजैविक, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे, चाचणी किट, ऑक्सिजन प्लान्ट आणि व्हेंटिलेटरची कार्यक्षमता यांची उपलब्धता सुसज्ज ठेवण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

चीनमध्ये रुग्णसंख्येत वाढ

चीनमध्ये गेल्या आठवड्यापासून आजारी रुग्णांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सध्या बीजिंग चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दररोज सरासरी 7,000 रुग्ण येत असून ते हॉस्पिटलच्या क्षमतेपेक्षा जास्त आहेत. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने महिन्याच्या मध्यात एक पत्रकार परिषद आयोजित करून श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे नमूद करतानाच विशेषत: इनफ्लूएन्झा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, लहान मुलांना होणारा सामान्य बॅक्टेरियाचा संसर्ग आणि रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस याची माहिती दिली होती.

Advertisement
Tags :

.