For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत आज टी-20 मालिका जिंकण्यास सज्ज

06:58 AM Jan 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत आज टी 20 मालिका जिंकण्यास सज्ज
Advertisement

भारतीय संघ आज रविवारी येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असताना इशान किशनच्या सनसनाटी पुनरागमनामुळे अभिषेक शर्माचा सलामीचा साथीदार कोण असावा यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू होईल. कारण संजू सॅमसनचा संघर्ष वाढत आहे.

Advertisement

टी-20 विश्वचषक विजेतेपदाच्या बचावाला सुऊवात होण्यापूर्वी फक्त दोन आठवडे आणि न्यूझीलंडविऊद्धच्या सध्याच्या मालिकेतील तीन सामने शिल्लक असताना भारताची संघरचना बऱ्यापैकी स्थिर झाली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी विभाग व्यवस्थित दिसत आहेत आणि फक्त काही जागांवरच लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. अशीच एक जागा सध्या सॅमसनची आहे. किशनच्या 32 चेंडूंतील शानदार 76 धावांच्या खेळीमुळे संजूवरचे दडपण अधिकच वाढले आहे. कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलच्या जागी अभिषेक शर्मासोबत सलामीवीर म्हणून संघात परतलेल्या सॅमसनला मिळालेल्या संधींचा फायदा घेता आलेला नाही आणि त्याला बऱ्याच संधी मिळालेल्या आहेत.

वेगवान गोलंदाजीविऊद्धची संजूची कमजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.  न्यूझीलंडविऊद्ध तो अनुक्रमे काइल जेमिसन आणि मॅट हेन्री यांच्या गोलंदाजीवर बाद होऊन त्याला केवळ 10 आणि 6 धावा करता आल्या. सॅमसन यष्ट्यांमागेही निष्काळजी दिसला आहे. त्याला अर्शदीप सिंगचा एक वाइड यॉर्कर पकडण्यात अपयश आले, ज्यामुळे चेंडू चार बाय धावांसाठी गेला आणि न्यूझीलंडने 200 धावांचा टप्पा ओलांडला.

Advertisement

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जात होती, परंतु त्याने 37 चेंडूंमध्ये 82 धावांची धडाकेबाज खेळी करत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय डावांनंतर अर्धशतक न करण्याची मालिका खंडित केली आणि आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या टी-20 सामन्यात सात गडी राखून मिळवलेला विजय अधिक प्रभावी होता, कारण तो फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्माच्या फारशा योगदानाशिवाय मिळवला गेला. अभिषेक पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

सूर्यकुमारने 10 चेंडूंमध्ये 10 धावांवरून पुढील 27 चेंडूंमध्ये 72 धावा फटकावत जोरदार वेग पकडला आणि भारताने 209 धावांचे लक्ष्य केवळ 15.2 षटकांत सहज गाठले. सूर्यकुमारने सूत्रे हाती घेण्यापूर्वी इशान किशनने 21 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकून विजयाचा पाया रचला. देशांतर्गत क्रिकेट खेळणे टाळल्याबद्दल करार यादीतून नाव वगळल्यानंतर पुनरागमन केल्यापासून झारखंडच्या या यष्टीरक्षक-फलंदाजाचा हा दुसरा सामना होता. गोलंदाजीत अर्शदीपने पहिल्या दोन षटकांत 36 धावा दिल्यानंतर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव व वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांनी मधल्या षटकांत धावांवर नियंत्रण ठेवले.

अक्षर पटेलची बोटाची दुखापत गंभीर नसावी आणि जागतिक स्पर्धेपूर्वी त्याला अधिक खेळण्याची संधी मिळावी, अशी भारताची इच्छा असेल. दुसऱ्या सामन्यात विश्रांती दिलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह परतण्याची शक्यता आहे. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील संघ काही डावपेचात्मक बदल करू शकतो, ज्यात कदाचित फॉर्ममध्ये असलेल्या डॅरिल मिशेलला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते. क्षेत्ररक्षण, जे सहसा न्यूझीलंडची ताकद असते, त्यात मोठी निराशा झाली. सँटनर आणि ईश सोधी यांनी झेल सोडले, ज्यात सूर्यकुमारने दिलेल्या सोप्या झेलचाही समावेश होता.

पाहुण्या संघाने डावपेचांच्या बाबतीतही चुका केल्या. मॅट हेन्रीच्या जागी झॅक फॉल्क्सला आणले, ज्याच्या पहिल्याच षटकात किशनने हल्ला चढवत 24 धावा लुटल्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याऐवजी ते एकाच साच्याला चिकटून राहिले आणि महत्त्वाच्या क्षणी भारताला रोखण्यात अपयशी ठरले.

संघ-भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वऊण चक्रवर्ती, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, हर्षित राणा.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, बेव्हन जेकब्स, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, टिम रॉबिन्सन, जिमी नीशम, ईश सोधी, झॅक फॉल्क्स, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, रचिन रवींद्र, काईल जेमिसन, मॅट हेन्री, जेकब डफी.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.

Advertisement
Tags :

.