महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत अफगाणिस्तानविरुद्धची ‘टी-20’ मालिका जिंकण्यास सज्ज

06:58 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 इंदूर येथे दुसरा सामना, विराट कोहली खेळणार, जितेश शर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदरला स्थान पक्के करण्याची संधी

Advertisement

वृत्तसंस्था/ इंदूर

Advertisement

अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकणे याची अजूनही क्रिकेटच्या भव्य पराक्रमांमध्ये गणना केली जात नसली, तरी आज रविवारी येथे होणार असलेल्या त्यांच्याविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय खेळाडूंचा एक गट ते साध्य करण्यासाठी उत्सुक असेल. मोहाली येथे भारताने पहिला सामना सहा गडी राखून जिंकून 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे.

आगामी टी-20 विश्वचषकासाठी परिपूर्ण संघ शोधण्याच्या हालचालींना वेग आल्याने जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी निवड समितीच्या नजरेत स्वत:ला ठेवण्यासाठी अफगाणविऊद्ध ठोस प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. जूनमध्ये होणाऱ्या त्या स्पर्धेपूर्वी भारत आणखी टी-20 मालिका खेळणार नसल्यामुळे अफगाणिस्तानविऊद्धच्या त्यांच्या कामगिरीला महत्त्व आले आहे.

जितेशकडे आघाडीवर राहण्यास सबळ आधार आहे. गेल्या वर्षी रायपूर येथे ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात इशान किशनची जागा घेतल्यापासून या यष्टिरक्षक फलंदाजाने त्याला मागे टाकले आहे. महाराष्ट्राच्या या खेळाडूने फलंदाजीच्या क्रमवारीत खाली येऊन काही उपयुक्त धावा केल्या आहेत. परंतु आपला दावा बळकट करण्याच्या दृष्टीने मोठी खेळी करण्याची संधी तो सोडणार नाही. 30 वर्षांच्या जितेशला हे चांगले ठाऊक आहे की, केवळ सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच तो इतरांपेक्षा पुढे राहू शकेल.

तिलक वर्माची बाबही तशीच आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने गेल्या वर्षी आपल्या ‘टी-20’ कारकिर्दीची उत्कृष्टरीत्या सुऊवात केली होती. त्याने वेस्ट इंडिजविऊद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत नाबाद 39, 51 आणि 49 धावा केल्या. मात्र तेव्हापासून वर्मा याला अपेक्षेनुरुप कामगिरी करता आलेली नाही. पुढील 13 डावांत त्याला फक्त एक अर्धशतक नोंदवता आले आणि तेही त्याने आशियाई खेळांमधील तुलनेने कमजोर बांगलादेशविरुद्ध झळकावले. तीन वेळा त्याने 20 हून अधिक, तर एकदा 30 हून अधिक धावा केलेल्या आहेत.

या 21 वर्षांच्या खेळाडूसाठी संघातील आपला जागा पक्की करण्याच्या दृष्टीने ही कामगिरी नक्कीच पुरेशी नाही आणि त्याला अर्धवेळ ऑफ-स्पिनर म्हणून वापरण्याचा प्रयत्न देखील यशस्वी ठरू शकलेला नाही. तथापि, पहिला सामना चुकविल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली या सामन्यासाठी उपलब्ध राहणार असल्याने वर्मा संघातील आपले स्थान कायम ठेवू शकेल का हे पाहावे लागेल. दुखापतीमुळे 50 षटकांच्या सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अक्षर आता दोन्ही प्रकारांत परतल्याचे दिसून येते.

या डावखुऱ्या फिरकीपटूचा इंग्लंडविऊद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे आणि त्याने गुऊवारी रात्री पीसीए स्टेडियमवरही चांगली गोलंदाजी करताना 4 षटकांत 23 धावा देऊन 2 बळी घेतले. गुजरातचा हा खेळाड या लढतीतून मालिका विजयास हातभार लावण्यास उत्सुक असेल. वॉशिंग्टन सुंदर सुद्धा परतलेला असला, तरी त्याला धडाकेबाज कामगिरी करता आलेली नाही. या सामन्यात ही स्थिती बदलण्याकडे त्याचे लक्ष असेल. जितेश आणि वर्मा यांच्या मनात खेळण्याची संधी मिळावी अशी आशा निर्माण झाली असेल. कारण इंदूरची खेळपट्टी अनेकदा फलंदाजांना भरपूर मदत करते आणि येथे ते चांगली खेळी हातून घडण्याची अपेक्षा धरू शकतात.

त्यामुळे अक्षर आणि सुंदर यांना खेळविल्यास त्यांना सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागेल. मोहाली येथे अक्षरने त्या प्रशंसनीय स्पेलद्वारे मदतकारी नसलेल्या परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे हे दाखवलेले आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या या संघाला गृहीत धरणेही बरोबर ठरणार नाही. त्यांच्याकडे भारताला धक्का देण्याची क्षमता आहे. तऊण रेहमानउल्ला गुरबाज, अजमतुल्ला उमरझाई आणि अनुभवी मोहम्मद नबी हे गोलंदाजीचा इतरांप्रमाणे समाचार घेऊ शकतात. फिरकीपटू रशिद खानची अनुपस्थिती जाणवत असली, तरी अफगाणिस्तानकडे पहिल्या सामन्यात चांगला लयीत दिसलेला मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फाऊकी यासारखे गोलंदाज आहेत. जर त्यांनी एकजुटीने चांगला मारा केला, तर सामन्याचे भवितव्य ते बदलू शकतात.

संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन्, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान : इब्राहिम झद्रन (कर्णधार), रेहमानउल्ला गुरबाज, इक्रम अलीखिल, हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रेहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब, रशिद खान.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7 वा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article