जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी भारत संधींची भूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन : बायोटेक स्टार्टअप एक्स्पोचे उद्घान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या प्रगती मैदानात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील पहिल्या बायोटेक स्टार्टअप एक्स्पो 2022 चे उद्घाटन केले आहे. देशातील पहिला बायोटेक स्टार्टअप एक्स्पो देशात जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या व्यापक विकासाचे प्रतिबिंब आहे. भारताची जैव-तंत्रज्ञान अर्थव्यवस्था मागील 8 वर्षांमध्ये आठपट वाढली आहे. 10 अब्ज डॉलर्सवरून 80 अब्ज डॉलर्सपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. भारत जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीच्या 10 देशांच्या यादीत लवकरच सामील होणार असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
भारताला जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संधींची भूमी मानले जात आहे. यासाठी प्रामुख्याने 5 घटक कारणीभूत आहेत. यात वैविध्यपूर्ण लोकसंख्या, विविध प्रकारचे हवामन असलेली क्षेत्रे, प्रतिभावंत मनुष्यबळ, व्यापार सुलभ करण्याच्या दिशेने प्रयत्न आणि जैवउत्पादनांची मागणी सामील असल्याचे मोदी म्हणाले.
जैवतंत्रज्ञान क्षेत्रात वेगोन विकास होत आहे. देशातील तरुण-तरुणी जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. तर सराकर देखील स्टार्टअप्सना मदत करत आहे. देशात मागील वर्षात 1100 हून अधिक स्टार्टअप सुरू झाले आहेत असे मोदींनी म्हटले आहे. बायोटेक स्टार्टअप एक्स्पो 2022 मध्ये पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, पियूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांनी भाग घेतला आहे.
5 हजारांहून अधिक स्टार्टअप
मागील 8 वर्षांमध्ये आमच्या देशात जवळपास 60 विविध उद्योगांमध्sय स्टार्टअपची संख्या वाढून 70 हजारांवर पोहोचली आहे. यातील 5 हजारांहून अधिक स्टार्टअप जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती मोदींनी दिली आहे. जगात आमच्या आयटी प्रोफेशनल्सचे कौशल्य आणि त्यांच्या नवोन्मेषाबद्दलचा विश्वास नव्या उंचीवर पोहोचला आहे. हाच विश्वास, हाच लौकिक, या दशकात भारताचे जैवतंत्रज्ञान क्षेत्र, भारतीय जैवतंत्रज्ञांसाठी निर्माण होत असताना आम्ही पाहत आहोत. मागील काही वर्षांमध्sय आम्ही अटल इनोव्हेशन मिशन, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या अंतर्गत उचललेल्या पावलांचा लाभ जैवतंत्रज्ञान क्षेत्राला मिळाला आहे. स्टार्टअप इंडियाच्या प्रारंभानंतर बायोटेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणाऱयांची संख्या 9 पट वाढली असल्याचे विधान पंतप्रधानांनी केले आहे.
दोन दिवसीय प्रदर्शन
बायोटेक स्टार्टअप एक्स्पोचे आयोजन जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून करण्यात आले आहे. या एक्स्पोची थीम ‘बायोटेक स्टार्टअप नवोन्मेष ः आत्मनिर्भर भारत की ओर’ अशी ठेवण्यात आली आहे. हे दोन दिवसीय आयोजन 10 जून रोजी समाप्त होणार आहे. हा एक्स्पो उद्योजक, गुंतवणूकदार, वैज्ञानिक, संशोधक, उत्पादक आणि शासकीय अधिकाऱयांना जोडण्यासाठी एका व्यासपीठाच्या स्वरुपात काम करणार आहे.
शेकडो स्टॉल्स बायोटेक स्टार्टअप एक्स्पो 2022 मध्ये 300 च्या आसपास स्टॉल असून यात आरोग्य देखभाल, जिनोमिक्स, बायोफार्म, कृषी, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जेसह विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रदर्शित केला जाणार आहे.