For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनच्या गुप्तचर पाळत यंत्रणेच्या टप्प्यात भारत

06:20 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
चीनच्या गुप्तचर पाळत यंत्रणेच्या टप्प्यात भारत
Advertisement

5,000 किलोमीटर पल्ल्याचे एलपीएआर रडार कार्यान्वित : धोका वाढला

Advertisement

► वृत्तसंस्था

नवी दिल्ली, बीजिंग

Advertisement

भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीनने म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या आपल्या युनान प्रांतात एक लार्ज फेझ्ड अॅरे रडार (एलपीएआर) कार्यान्वित केले आहे. या रडारचा पल्ला 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त असल्यामुळे आता भारतही या यंत्रणेच्या टप्प्यात आला आहे. हे रडार भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा मागोवा घेण्यास आणि हिंदी महासागराच्या मोठ्या भागावर पाळत ठेवण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. ही यंत्रणा भारताच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकते.

चीन गेल्या काही वर्षांपासून आपली पाळत ठेवण्याची यंत्रणा सातत्याने मजबूत करत आहे. युनानमध्ये स्थापित केलेले हे नवीन एलपीएआर रडार देखील याच संदर्भात महत्त्वाचे मानले जाते. हे रडार दूरस्थपणे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs शोधू शकते, त्यांच्या उ•ाणाचा मागोवा घेऊ शकते आणि माहितीही गोळा करू शकते. याचा पल्ला 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. चीन पूर्व भारत, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या मोठ्या भागावर पाळत ठेवू शकतो. हे रडार ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्यांचाही मागोवा घेऊ शकते. भारत येथून अग्नी-5, के-4 आणि इतर आधुनिक क्षेपणास्त्रांची चाचणी करतो. जर कोणत्याही देशाला या क्षेपणास्त्रांविषयी उ•ाण आणि इतर तांत्रिक माहिती मिळाली, तर तो त्यानुसार आपली संरक्षण सज्जता मजबूत करू शकतो.

Advertisement
Tags :

.