भारत सहाव्या स्थानी
06:45 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नागोया
Advertisement
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या व्हॉलीबॉल प्रकारात भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. शनिवारी येथे पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात थायलंडकडून भारताला 19-25, 25-17, 21-25, 25-17, 15-17 अशा गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला. हा सामना जवळपास 2 तास चालला होता. या सामन्यात भारतातर्फे जेरोमी विनीतने सर्वाधिक म्हणजे 22 गुण नोंदविले. तर थायलंडतर्फे सुवितने 25 गुण नोंदविले.
Advertisement
Advertisement