For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताकडून स्टील आयातीवर 12 टक्क्यांची कर आकारणी

06:51 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारताकडून स्टील आयातीवर 12 टक्क्यांची कर आकारणी
Advertisement

संबंधीत कर 200 दिवसांसाठी लागू राहणार : अर्थमंत्रालयाकडून माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

अनियमित आयात रोखण्यासाठी भारताने काही स्टील उत्पादनांवर 12 टक्के इतका तात्पुरता कर जाहीर केला आहे. या तात्पुरत्या कराला सेफगार्ड ड्युटी म्हणून ओळखले जाते. अर्थ मंत्रालयाने सोमवारी एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्च्या स्टीलचा उत्पादक देश असलेल्या भारताने सांगितले की, सोमवारपासून लागू होणारे हे कर 200 दिवसांसाठी लागू राहतील. जोपर्यंत ते काढून टाकले जात नाहीत किंवा त्यात बदल केले जात नाहीत तो पर्यंत लागू राहणार आहेत.

Advertisement

 भारताचे पहिले मोठे व्यापार धोरण

एप्रिलमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर विविध कर लादले. यानंतर भारताचे पहिले मोठे व्यापार धोरण म्हणजे स्टील आयात शुल्कात वाढ केली आहे. उपलब्ध वृत्तानुसार, भारताचे कर प्रामुख्याने चीनला लक्ष्य करतात. 2024-25 मध्ये दक्षिण कोरियानंतर चीन भारताला दुसरा सर्वात मोठा निर्यातदार होता.

सलग दुसऱ्या वर्षी स्टीलचा आयातदार

2024-25 या आर्थिक वर्षात भारत सलग दुसऱ्या वर्षी तयार स्टीलचा निव्वळ आयातदार राहिला आहे. सरकारी आकडेवारीनूसार, निर्यात 9.5 दशलक्ष मेट्रिक टनांच्या नऊ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. स्टील उत्पादकांनी आयातीबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर अंकुश लावण्याची मागणी केली होती. नवी दिल्लीतील प्रमुख स्टील उत्पादकांच्या एका संघटनेने आयातीबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर अंकुश लावण्याची मागणी केली होती.  या सदस्यांमध्ये जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील तसेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आणि आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया या कंपन्यांच्या सदस्यांचा  समावेश आहे.

Advertisement
Tags :

.