महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारताने अर्जेटिनाला बरोबरीत रोखले

06:55 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामना 1-1 बरोबरीत : अखेरच्या मिनिटाला हरमनप्रीतचा निर्णायक गोल

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव ऑलिम्पिकची दणक्यात सुरुवात करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला दुसऱ्या सामन्यात मात्र चांगलाच संघर्ष करावा लागला. सोमवारी झालेल्या या सामन्यात भारताने अर्जेटिनाला 1-1 असे बरोबरीत रोखले. 59 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने शानदार गोल केला. आता, भारताचा तिसरा सामना मंगळवारी आयर्लंडविरुद्ध होईल.

भारत व अर्जेंटिना यांच्यातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. दुसऱ्या सत्रात मात्र 22 व्या मिनिटाला अर्जेटिनाच्या लुकास मार्टिनीजने शानदार गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी घेऊन दिली. मध्यंतरापर्यंत अर्जेटिनाकडे 1-0 अशी आघाडी कायम होती. तिसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी शर्थीचे प्रयत्न केले पण तरीही गोल करता आला नाही. या सत्रात भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण दोन्ही प्रयत्नात अपयश आले. पहिल्या तीनही सत्रात अपयश आल्यानंतर चौथ्या सत्रात मात्र भारतीय खेळाडूंनी अर्जेटिनाला जोरदार टक्कर दिली. सामना संपण्यास अवघा एक मिनिट बाकी असताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने शानदार गोल केला व भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या गोलमुळे हातून निसटलेल्या सामन्यात भारतीय संघाने बरोबरी साधली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article