For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

DRDO ने केली बाँबची यशस्वी चाचणी, भारताने गाठला यशाचा नवा टप्पा

09:56 PM May 31, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
drdo ने केली बाँबची यशस्वी चाचणी  भारताने गाठला यशाचा नवा टप्पा
Advertisement

सर्व भारतीयांसाठी अभिंमानस्पद वाटावे असे एक वृत्त समोर आले आहे. भारताने एक नवीन टप्पा गाठला आहे. डीआरडीओने हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील रामगढ येथील आपल्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीमध्ये एका उच्च-स्फोटक बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे. हे डीआरडीओचे एक युनिट आहे. या चाचणीवेळी परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या तसेच घराबाहेर न पडण्याचा सल्ला डीआरडीओ ने  दिला होता.

Advertisement

घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (DRDO) एक प्रमुख प्रयोगशाळा असलेल्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीने (TBRL) रविवारी हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील रामगढ चाचणी केंद्रावर बॉम्बची चाचणी केली. या चाचणीच्या पार्श्वभूमीवर, पंचकुला जिल्ह्यातील भानू आणि बिल्ला गावातील रहिवाशांना नियोजित वेळेत घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्फोटादरम्यान बॉम्बचे तुकडे अंदाजे १.५ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती आणि ते स्फोटस्थळापासून २ किलोमीटरपर्यंत आडव्या दिशेने पसरू शकत होते. त्यामुळे, चाचणी सुरक्षितपणे पार पडावी यासाठी स्फोटस्थळाभोवती दोन किलोमीटरचे सुरक्षा क्षेत्र तयार करण्यात आले होते.

Advertisement

वास्तविक पाहता, चाचणी क्षेत्राजवळील भानू आणि बिल्ला ही गावे बॉम्बचे तुकडे पडण्याच्या धोक्याच्या क्षेत्रात येत होती, त्यामुळे पंचकुला जिल्हा प्रशासनाने चाचणीच्या काळात गावकऱ्यांना घरातच राहण्याचा सल्ला आधीच दिला होता.
Advertisement
Tags :

.