व्हेनेझुएलासोबत भारताचे चांगले संबंध
भारताने भूमिका केली स्पष्ट : व्हेनेझुएलाच्या जनतेचे व्हावे कल्याण
वृत्तसंस्था/ लक्झेंम्बर्ग
भारताने व्हेनेझुएलामध्ये ट्रम्प यांच्या ऑपरेशन ‘एब्सोल्युट रिझॉल्व’बद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारत व्हेनेझुएलातील अलिकडच्या घटनांवरून चिंतेत आहे. व्हेनेझुएलाच्या जनतेच्या हिताचा ठरेल अशाप्रकारचा तोडगा सर्व घटकांनी चर्चेद्वारे शोधून काढावा असे उद्गार विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या सैन्यमोहिमेच्या पार्श्वभूमीवर काढले आहेत. भारताचे व्हेनेझुएलासाब्sात दीर्घकाळापासून चांगले संबंध राहिले आहेत असेही लक्झेंम्बर्गच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान जयशंकर यांनी म्हटले आहे.
आम्ही वर्तमान घटनांवरून चिंतेत आहोत. परंतु व्हेनेझुएलाच्या जनतेचे कल्याण आणि सुरक्षेच्या हितात असलेल्या सिथतीवर पोहोचण्याचा आग्रह आम्ही सर्व संबंधित घटकांना करत आहोत. भारत आणि व्हेनझुएलाचे संबंध दीर्घकाळापासून चांगले राहिले आहेत. व्हेनेझुएलाच्या जनतेचे कल्याण व्हावे हीच भारताची इच्छा असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
व्हेनेझुएलामधील स्थितीवर भारत सरकार बारकाईने नजर ठेवून आहे. काराकास येथील भारतीय दूतावास तेथे राहत असलेल्या भारतीयांच्या संपर्कात असून शक्य ती मदत करत राहणार असल्याचे विदेश मंत्रालयाने सोमवारी म्हटले होते. तसेच वाढत्या तणावादरम्यान मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या असून यात भारतीय नागरिकांना व्हेनेझुएलाचा अनावश्यक प्रवास टाळण्याची सूचना करण्यात आली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर अनेक आरोप करत सैन्यमोहीम राबविण्याच आदेश दिला होता. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. व्हेनेझुएलामधील तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न अमेरिकेचा असल्याचे मानले जात आहे.