भारताला आज मालिका जिंकण्याची संधी
संजू सॅमसनची दर्जेदार वेगवान माऱ्यासमोरील धडपड, रिंकू सिंगची तंदुरुस्ती हे चिंतेचे विषय
वृत्तसंस्था/पुणे
चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आज शुक्रवारी येथे होणार असून त्यात इंग्लंडविऊद्ध खेळताना संजू सॅमसनच्या वेगवान गोलंदाजांविऊद्धच्या तांत्रिक कमकुवत दुव्यांसह रिंकू सिंगचा खराब फॉर्म आणि तंदुऊस्तीच्या समस्या या भारतासाठी चिंतेचा विषय असतील. राजकोटमधील तिसऱ्या टी-20 सामन्यात संधी गमावल्यानंतर पाच सामन्यांच्या मालिकेतील या चौथ्या सामन्यात यजमानांना मालिका जिंकण्याच्या दृष्टीने नामी संधी राहील. यानंतर 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणाऱ्या अंतिम सामन्यात मालिका जिंकण्याची आणखी एक संधी भारताला मिळेल. सूर्यकुमार यादवच्या संघाने कोलकाता आणि चेन्नई येथे पहिले दोन सामने जिंकले होते. केरळचा यष्टिरक्षक-फलंदाज सॅमसनने चालू मालिकेपूर्वी बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्ध तीन शतके झळकावून टी-20 हंगामाची धूमधडाक्यात सुऊवात केली होती. चालू मालिकेत त्याने 26, 5 आणि 3 धावा केल्या आहेत आणि टी-20 क्रिकेटमधील जोखीम तसेच त्यात आजकाल फलंदाज ज्या प्रकारचे फटके खेळतात ते लक्षात घेता हे आकडे चिंताजनक नाहीत.
पण सॅमसनच्या बाबतीत चिंतेची बाब ताशी 145 किलोमीटरांपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणाऱ्या कोणत्याही गोलंदाजाविऊद्ध त्याला जाणवणारी अस्वस्थता ही आहे. बांगलादेशविऊद्ध घरच्या मैदानांवर त्याने तस्किन अहमद, तन्झिम हसन शाकिबचा, तर दक्षिण आफ्रिकेत अँडिले सिमलेन आणि लुथो सिपामला या गोलंदाजांचा सामना केला. हे वेगवान गोलंदाज फारसे घाबरविणारे नव्हते आणि सॅमसनने त्यांना योग्यरीत्या हाताळले. ते सारे ताशी 130 ते 140 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणारे होते. तथापि, आर्चर आणि मार्क वूड हे वेगळे असून ते ताशी 145 ते 155 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करतात आणि ही गती सॅमसनसाठी समस्या निर्माण करत आहे. तिन्ही सामन्यांमध्ये बॅट खाली आणण्याच्या आधीच चेंडू सॉल्टच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला. त्यातच चेंडूचा टप्पा व तीव्र उसळी या बाबी समस्या निर्माण करू लागल्या आहेत.
असून फलंदाजीस पोषक खेळपट्टीवरही योग्य तंत्र नसल्यास किंवा नियमितपणे अशा दर्जाच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करत नसल्यास फटकेबाजी करणे हे सोपे नसते. पण सॅमसन हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा आवडता खेळाडू आहे आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात तो कायम राहील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, रिंकू सिंगच्या पाठीच्या दुखापतीने संघ व्यवस्थापनाला ध्रुव जुरेलला 7 च्या स्थानावर खेळविणे भाग पाडले. परंतु तो कसोटी क्रिकेटच्या विपरित या स्वरूपात सुरात दिसलेला नाही. रिंकूला पहिल्या दोन सामन्यांत विश्रांती देण्यात आली होती आणि चौथ्या सामन्यापूर्वी तो तंदुऊस्त होण्याची अपेक्षा आहे. परंतु टी-20 कारकिर्दीची शानदार सुऊवात केल्यानंतर रिंकूची गाडी देखील रुळावरून घसरली आहे.
भारताच्या मधल्या फळीला आतापर्यंत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशिदला नीट खेळता आलेले नाही आणि शिवम दुबे पुन्हा संघात आलेला असल्याने गंभीर त्याला खेळविण्याचा पर्याय चोखाळून पाहील का, हे पाहावे लागेल. तिसरा पर्याय म्हणजे रमणदीप सिंग असून तो फिनिशर म्हणूनही चांगला दिसतो आणि दुबेपेक्षा चांगला वेगवान गोलंदाज आहे. पण दर्जेदार वेगवान माऱ्याविरुद्ध अद्याप त्याची कसोटी लागलेली नाही. मोहम्मद शमीने प्रत्यक्ष सामन्यात खूप गोलंदाजी करण्याची आवश्यकता असून राजकोटच्या सामन्यातून त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द पुन्हा चांगल्या पद्धतीने सुरू झालेली असली, तरी ती सुरुवात शानदार राहिलेली नाही. सध्याची परिस्थिती पाहता इंग्लंडविऊद्धची घरच्या मैदानावरील टी-20 मालिका गमावणारा भारताचा पहिला प्रशिक्षक बनण्याची बदनामी गंभीरला कदापि परवडणारी नाही. म्हणूनच जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताचा सर्वोत्तम टी-20 गोलंदाज अर्शदीप सिंग परत येऊन पॉवरप्लेमधील षटकांमध्ये यश मिळवून देऊ शकतो का हे पाहावे लागेल.
- भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, वऊण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, शिवम दुबे, रमणदीप सिंग, हर्षित राणा.
- इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, आदिल रशिद, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, जेकब बेथेल, साकिब मेहमूद.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.