भारत-फ्रान्स यांच्यातील व्यापारासाठी सहकार्याची अपेक्षा
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल : मुख्य पाच क्षेत्रांसाठी सहाय्य करण्यावर चर्चा
नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान आगामी काळासाठी पाच व्यापक क्षेत्रांसाठी सहकार्य करण्याची अपेक्षा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रामुख्याने यामध्ये कृषी व अन्न प्रक्रिया, अक्षय ऊर्जा, एअरोस्पेस, संरक्षणासह वाहन आणि ईव्ही वाहनांसोबत डिजिटल तंत्राज्ञानाचाही समावेश राहिला असल्याचे यावेळी वाणिज्य मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले आहे. भारत मागील काही दिवसांपासून आपल्या संरक्षण क्षेत्राचा विस्तार करत आहे. यासाठी केंद्र सरकार भारतात उत्पादन निर्मितीसाठी जगभरातील कंपन्यांना निमंत्रण देत प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आले आहे. यासोबतच सदरच्या कंपन्यांना 100 टक्के मालकी हक्क देत आहे. भारत आणि फ्रान्स यांनी प्रामुख्याने फ्रान्ससोबत संरक्षण करार केले असून यामध्ये जास्तीत जास्त भारतामधील पेटंटसाठी तंत्रज्ञानावर आधारीत व्यवस्थापन हस्तांतरण करण्यावर जोर दिला जात असल्याचे चित्र आहे.
हवाई क्षेत्रात भारत मोठी बाजारपेठ
भारत विमान क्षेत्रामध्ये जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. यामध्ये भारताने 1500 विमानांची ऑर्डर दिली आहे. तर ही ऑर्डर वाढवून जवळपास 2000 विमानांपर्यंत होणार असल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले.