For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चाबहार बंदरावर भारताचे लक्ष केंद्रीत

06:14 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
चाबहार बंदरावर भारताचे लक्ष केंद्रीत
Advertisement

इराणसोबत चर्चा जारी : ट्रम्प यांच्या पुढील पावलाविषयी सर्वांना प्रतीक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि इराणदरम्यान चाबहार बंदराच्या व्यवस्थापनावरून चर्चा जारी आहे. याचदरम्यान अमेरिका इराणसोबत शांतता चर्चेची नवी फेरी सुरू करू इच्छित आहे. परंतु भारत एका करारानंतर इराणवर लादलेले अमेरिकेचे निर्बंध हटण्याची प्रतीक्षा करत आहे. तसेच चाबहार बंदरातील स्वत:च्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी कराराला लवकरात लवकर अंतिम रूप देण्यासाठी इराणसोबत चर्चा करत आहे.

Advertisement

भारताने ऑक्टोबर 2025 मध्ये अमेरिकेकडून बंदरासंबंधी 6 महिन्यांची निर्बंध सूट प्राप्त केली होती, ज्याची मुदत चालू वर्षाच्या एप्रिल महिन्यात संपुष्टात आली आहे.

चाबहारविषयी चर्चा

भारत सरकार चाबहार बंदराच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक बंदर प्राधिकरणासोबत करार करण्यासाठी इराणशी चर्चा करत आहे. अमेरिकेचे निर्बंध हटल्यावर हा अधिकार परत भारताला सोपविण्यात येईल अशी हमी या करारात असणार आहे. दोन्ही बंदर प्राधिकरणांदरम्यान झालेल्या कराराचे पालन केले जाऊ शकेल याकरता भारत इराण सरकारकडून कायदेशीर हमी मागत आहे.

भारतासाठी महत्त्वपूर्ण बंदर

-इराणमधील चाबहार बंदर भारताच्या रणनीतिक पोहोचसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे जाणकारांचे सांगणे आहे.

-भारत कुठल्या न कुठल्या रुपात बंदरात स्वत:ची भूमिका कायम राखू इच्छितो, अन्यथा चीन या बंदरावर स्वत:चा दावा करू शकतो.

-मागील काही वर्षांमध्ये वाढत्या आव्हानानंतरही भारताने इराणच्या चाबहार बंदरामधील स्वत:ची रुची त्यागलेली नसल्याचे जगजाहीर आहे.

-चाबहार बंदर केवळ अफगाणिस्तानसाठी नव्हे तर मध्य आशियाई देशांसाठी देखील भारतीय अन् आखाती बाजारांपर्यत पोहोचण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.

-भारत चाबहार बंदर प्रकल्पातून मागे हटल्यास अफगाणिस्तान, मध्य आशिया, रशिया आणि युरोपर्यंत जमिनी व्यापारी पोहोच निर्माण करण्याची संधी गमावणार.

चाबहार बंदराचे रणनीतिक महत्त्व

चाबहार बंदराचे रणनीतिक महत्त्व पाहता 2016 साली भारत, इराण आणि अफगाणिस्तानने त्रिपक्षीय करार केला होता. भारत 2019 पर्यंत इराणकडून कच्चे तेल खरेदी करत राहिला आणि चाबहारच्या विस्तारासंबंधी चर्चाही जारी होती. परंतु अमेरिकेने जेव्हा 25 टक्के शुल्क लादण्याची धमकी दिली तेव्हा चाबहार बंदरातील भारताच्या हालचाली मर्यादित होऊ लागल्या.

विश्वेश नेगी पुढील राजदूत

पश्चिम आशियातील संकटादरम्यान भारत सरकारने विश्वेश नेगी यांना इराणमधील पुढील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. विश्वेश नेगी सध्या विदेश मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत होते. नेगी हे 2002 च्या तुकडीचे आयएफएस अधिकारी आहेत. नेगी यांना राजनयिक अन् प्रशासकीय दोन्हींचा प्रदीर्घ अनुभव आहे. विदेशमंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून त्यांनी विदेश धोरणाशी निगडित महत्त्वपूर्ण प्रकरणे अन् द्विपक्षीय संबंध हाताळण्यास अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नेगी यांनी 2022 साली संरक्षण विभागात ओएसडी म्हणूनही सेवा बजावलेली आहे.

Advertisement
Tags :

.