For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वचषक हॉकीसाठी पात्रता मिळविण्यावर भारताचा भर

02:37 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
विश्वचषक हॉकीसाठी पात्रता मिळविण्यावर भारताचा भर
Advertisement

वृत्तसंस्था/ अॅमस्टलव्हीन

Advertisement

भारतीय पुरुष हॉकी संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळविण्यासाठी एफआयएच प्रो लीगच्या युरोपियन टप्प्यातून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आणि जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.

बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्यात संयुक्तपणे  पुढील वर्षी विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगच्या यांच्याकडे राहणार आहे. भारतीय संघ सध्या आठ सामन्यांतून 15 गुणांसह

Advertisement

प्रो लीग क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असून बेल्जियम (16) आणि इंग्लंड (16) यांच्या बरोबरीत आहे. युरोपियन लीगच्या आगामी आठ सामन्यांमधील चांगले निकाल भारताला अव्वल स्थानावर पोहोचवू शकतो. म्हणजेच थेट पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात स्थान मिळवू शकतात. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या प्रो लीगचा घरच्या मैदानावर खेळला होता, जिथे त्यांनी आठ सामन्यांत पाच विजयांसह 15 गुण मिळवले होते. या महिन्यात होणाऱ्या युरोपियन लीगमध्ये स्पर्धेत भारताचा पहिला सामना यजमान नेदरलँड्सशी 9 जून रोजी होणार तर भारतीय संघ पुढील सामना 11 आणि 12 जून रोजी अर्जेंटिनाशी, त्यानंतरचे सामने ऑस्ट्रेलियासोबत (14, 15 जून) आणि बेल्जियम सोबत (21, 22 जून) सामने खेळणार आहे.

भारताचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग करेल, तर मिडफिल्डचा मुख्य आधारस्तंभ हार्दिक सिंगकडे उपकर्णधारपद असेल. भारतीय संघ अँटवर्पमधील त्यांच्या घरच्या मैदानावर बेल्जियमशी सामना करेल. भारताने या लीगसाठी अनुभवी 24 सदस्यीय संघ उतरवला आहे. भारतीय गोलकीपरची धुरा कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांच्याकडे असेल तर बचावाची धुरा अमित रोहिदास, अरमानप्रीत, जुगराज सिंग, जरमनप्रीत सिंग, संजय आणि निलम संजीप झेस यांच्याकडे असेल.  मनप्रीत सिंग, उपकर्णधार हार्दिक, विवेक सागर प्रसाद, नीलकांता शर्मा, शमशेर सिंग, राज कुमार पाल आणि राजिंदर सिंग हे मिडफिल्डमध्ये कर्तव्य बजावतील. भारताकडे गुरजंत सिंग, अभिषेक, शिलानंद लाक्रा, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, दिलप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांच्यासारखा मजबूत स्ट्राईक फोर्सचा आहे या संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन आहेत.

Advertisement

.