जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत भारत सातव्या स्थानी
भारताची 6 सुवर्ण,6 रौप्य,6 कांस्य पदकाची कमाई
वृत्तसंस्था / ► नवी दिल्ली
येथे सुरू लेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय अॅथलेट्सनी आजवरचे सर्वोत्तम प्रदर्शन करीत एकूण 18 पदके पटकावली. त्यात प्रत्येकी सहा सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांचा समावेश आहे. रविवारी एकता भ्यान, प्रवीण कुमार व सोमन राणा यांनी पदके मिळविली.
एकता भ्यानने भारताला या स्पर्धेतील 18 वे पदक मिळवून दिले. सातव्या दिवशी भारताने एकूण तीन पदके मिळविली, त्यात दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. सोमन राणाने एफ 57 गोळाफेकमध्ये तर प्रवीण कुमारने टी 64 उंच उडीमध्ये ही पदके मिळविल्याने भारत पाचव्या स्थानावर राहिला. चीनने ब्राझीलला मागे टाकत सर्वाधिक 41 पदके मिळवित पहिले स्थान पटकावले. एफ 51 लाठीफेकमध्ये विद्यमान विजेती असणाऱ्या एकताने शेवटच्या प्रयत्नात 19.80 मी. लाठीफेक करीत दुसरे स्थान मिळविले. युक्रेनच्या झोइआ ओव्हसीने 24.03 मी. लाठीफेक करीत सुवर्ण पटकावले. यापूर्वीच्या कोबे येथे झालेल्या स्पर्धेत भारताने 17 पदके मिळविली होती. 40 वर्षीयएकताने 2023 मध्ये कांस्य तर 2024 मध्ये सुवर्णपदक मिळविले होते.