For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतातून 30 अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोनची निर्यात

06:32 AM Jan 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतातून 30 अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोनची निर्यात
Advertisement

2025 मधील कामगिरी : पीएलआय योजनेचे पाठबळ

Advertisement

नवी दिल्ली :

भारताने अलीकडेच स्मार्टफोनच्या निर्यातीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत भारताने 30 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याचे स्मार्टफोन निर्यात केले आहेत. 2021 पासून गेल्या पाच वर्षांमध्ये देशातून जेवढ्या मूल्याचे स्मार्टफोन निर्यात झाले आहेत त्या तुलनेमध्ये 38 टक्के इतके प्रमाण मागच्यावर्षी दिसून आले आहे. पीएलआय या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेमुळे स्मार्टफोन कंपन्यांना दमदार उत्पादनासोबत निर्यातीचे नवे लक्ष गाठणे शक्य आहे.

Advertisement

‘अॅपल’च नंबर वन

2021 ते 2025 या कालावधीत भारतातून जवळपास 80 अब्ज डॉलर्सच्या मूल्याचे स्मार्टफोन निर्यात केले गेले आहेत. 2025 या वर्षात निर्यात झालेले स्मार्टफोन मूल्य आतापर्यंतचे सर्वाधिक मानले जात आहे. देशातील स्मार्टफोनच्या निर्यातीत अमेरिकेतील आयफोन कंपनी अॅपल यांचा वाटा 75 टक्के आहे. जानेवारी ते डिसेंबर या दरम्यान 22 अब्ज डॉलर्सच्या मूल्याचे आयफोन कंपनीने भारतातून निर्यात केले आहेत. 2024 मध्ये 20.45 अब्ज डॉलर्स मूल्याचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले होते.

निर्यातीतील निर्भेळ यश

2020 मध्ये सरकारने पीएलआय म्हणजेच उत्पादन प्रोत्साहन सवलतीची योजना जाहीर केली होती. 2020 मध्ये सुरू झालेल्या 16 पीएलआय योजनांमध्ये स्मार्टफोन निर्मात्यांनी या योजनेचा सर्वाधिक लाभ उठविला होता. या योजनेचा लाभ उठवतच देशात स्थापन झालेल्या स्मार्टफोन कंपन्यांनी उत्पादन वाढीसोबत विक्रमी निर्यात करण्याचे ध्येय गाठले आहे. 2015 मध्ये भारत हा मोबाईल फोनच्या निर्यातीमध्ये 167 व्या स्थानावर होता तर आज मात्र अग्रस्थानावरती भारत पोहचला आहे.

जागतिक शिपमेंटमध्येही अॅपलच

जागतिक स्मार्टफोन शिपमेंटमध्येही अॅपलने 20 टक्के इतका वाटा साध्य करत आघाडी घेतली आहे. कौंटरपॉइंट रिसर्च यांच्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे. 2025 मध्ये 2 टक्के वाढीसह स्मार्टफोन शिपमेंटमध्ये अग्रस्थान राखले आहे. यानंतर सॅमसंग 19 टक्केसह दुसऱ्या व शाओमी 13 टक्के वाट्यासह तिसऱ्या स्थानी राहिली.

बोलकी आकडेवारी...

22 अब्ज डॉलर्सची अॅपलकडून निर्यात

2015 मध्ये निर्यातीत भारत 167 स्थानी

2021-2025 अॅपलकडून 80 अब्ज डॉलर्सची निर्यात

स्मार्टफोन निर्यातीत अॅपलचा 75 टक्के वाटा

जागतिक शिपमेंटमध्ये 20 टक्के हिस्सेदारी

Advertisement
Tags :

.