For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-इंग्लंड महिला टी-20 मालिका आजपासून

06:47 AM Jun 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत इंग्लंड महिला टी 20 मालिका आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था / लंडन

Advertisement

हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून आता उभय संघामध्ये पहिली पाच सामन्यांची द्विपक्षीय टी-20 मालिका शनिवारपासून येथे सुरू होणार आहे.

ट्रेंट ब्रिज येथे उभय संघातील पहिला सामना खेळविला जाणार असून त्यानंतर या मालिकेतील पुढील सामने ब्रिस्टॉल, द ओव्हल, ओल्ड ट्रॅपोर्ड आणि एजबेस्टन येथे खेळविले जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामन्यांचे प्रक्षेपण भारतामध्ये केले जाणार आहे. महिलांच्या टी-20 मानांकनात भारत तिसऱ्या स्थानावर असून इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने झाले असून त्यात इंग्लंडने 22 तर भारताने 8 सामने जिंकले आहेत. गेल्या खेपेला उभय संघात भारतात झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने भारताचा 2-1 असा पराभव केला होता. आतापर्यंत भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्ध एकदाही द्विपक्षीय मालिका जिंकलेली नाही. 2006 साली उभय संघात केवळ एकमेव टी-20 सामना खेळविला गेला होता आणि भारताने इंग्लंडच्या महिला संघावर टी-20 मधील आपला पहिला विजय नोंदविला होता.

Advertisement

इंग्लंडमध्ये होणाऱ्या या मालिकेसाठी कर्णधार हरमनप्रित कौरने अनुभवी स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका ठाकुर, दीप्ती शर्मा यांची चांगलीच साथ लाभेल. या मालिकेसाठी शेफाली वर्माचे भारतीय संघात पुन्हा आगमन झाले आहे. त्याच प्रमाणे क्रांती गौड, नेलापुरे•ाr चरणी, सुची उपाध्याय आणि अष्टपैलू सायली सातघरे यांचे या दौऱ्यात टी-20 प्रकारात पदार्पण होत आहे. इंग्लंडचे नेतृत्व नॅट सिव्हर ब्रंटकडे सोपविण्यात आले आहे. अलिकडेच तिच्या नेतृत्वाखाली इंग्लंड महिला संघाने विंडीजचा 3-0 असा पराभव केला होता. पुढील वर्षी भारतात आयसीसी महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या पुनर्बांधणी प्रक्रियेला या दौऱ्याने प्रारंभ होत आहे.

भारतीय संघ : हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तीका भाटीया, हर्लिन देवोल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्रीचरणी, सुची उपाध्याय, रेणुका ठाकुर, अमनजोत कौर, अरुंधती रे•ाr, क्रांती गौड आणि सायली सातघरे.

इंग्लंड महिला संघ : नॅट सिव्हर ब्रंट (कर्णधार), आर्लोट, ब्युमॉन्ट, लॉरेन बेल, अॅलिस कॅप्से, चार्ली डीन, सोफीया डंक्ले, सोफी इक्लेस्टोन, लॉरेन फिलेर, अॅमी जोन्स, स्कोफिल्ड, लिनसे स्मिथ, डॅनी वॅट हॉज, ईसी वाँग

इंग्लंड वि. भारत स्पर्धा वेळापत्रक

28 जून इंग्लंड वि. भारत पहिला टी-20 सामना, वेळ सायंकाळी 7

1 जुलै इंग्लंड वि. भारत दुसरा टी-20 सामना, वेळ रात्री 11

4 जुलै इंग्लंड वि. भारत तिसरा टी-20 सामना, वेळ रात्री 11.05

9 जुलै इंग्लंड वि. भारत चौथा टी-20 सामना, वेळ रात्री 11

12 जुलै इंग्लंड वि. भारत पाचवा टी-20 सामना, वेळ रात्री 11.05

Advertisement
Tags :

.