For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात 27 पासून भारत ऊर्जा सप्ताह

12:12 PM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात 27 पासून भारत ऊर्जा सप्ताह
Advertisement

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

पणजी : अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा गोव्यात ‘भारत ऊर्जा सप्ताह’ दि. 27 पासून 30 जानेवारीपर्यंत गोव्यात होत असून या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 रोजी गोव्यात येणार आहेत. परिषदेत आंतरराष्ट्रीय तेल, ऊर्जा इत्यादी विषयी सखोल चर्चा होणार आहे. यामध्ये अनेक राष्ट्राचे ऊर्जामंत्री सहभागी होतील. बेतुल येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या परिसरामध्ये ही परिषद भरणार असून भारताचे ऊर्जामंत्री तसेच इतर अनेक देशातील मंत्री त्यात सहभागी होणार आहेत. परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतील. यानिमित्ताने पंतप्रधान 27 रोजी दुपारी तीन वाजता गोव्यात येतील.

भारताचा इथेनॉल मिश्रण कार्यक्रम जागतिक मानक म्हणून उदयास आला आहे, ज्याने लक्षणीय परिणाम साध्य केले आहेत. यामध्ये 2014 पासून आतापर्यंत 1.59 लाख कोटी ऊपयांची विदेशी चलनाची बचत,813 लाख मेट्रिक टन कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनात घट, 270 लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाला पर्याय, तेल विपणन  कंपन्यांकडून इथेनॉल डिस्टिलर्सना 2.32 लाख कोटी ऊपयांचे शुल्क वितरण आणि शेतकऱ्यांना थेट दिलेले 1.39 लाख कोटी ऊपये यांचा समावेश आहे. जैवइंधन, हरित  हायड्रोजन, शाश्वत इंधन आणि उदयोन्मुख कमी-कार्बन तंत्रज्ञान हे भारत ऊर्जा सप्ताह 2026 मधील चर्चेचे प्रमुख विषय असतील.

Advertisement

चार दिवसांच्या कालावधीत मंत्र्यांच्या गोलमेज परिषदा, मुख्य कार्यकारी अधिकारी संवाद, सार्वजनिक-खाजगी क्षेत्र परस्परसंवाद, तंत्रज्ञान सादरीकरणे, प्रदर्शने, सामाजिक कार्यक्रम आणि माध्यमांशी संवाद यांचा समावेश असेल. विशेष सत्रांमध्ये हायड्रोजन अर्थव्यवस्था, हरित वित्तपुरवठा, शाश्वत इंधन, चक्रीय अर्थव्यवस्था, डिजिटल परिवर्तन आणि मनुष्यबळ विकास यावर लक्ष केंद्रित केले जाईल. विस्तारित प्रदर्शनामध्ये संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीतील शेकडो कंपन्या सहभागी होतील, ज्यांना व्यापक आंतरराष्ट्रीय सहभाग आणि देशांच्या पॅव्हेलियनचे पाठबळ असेल.

Advertisement
Tags :

.