जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत भारताचे वर्चस्व
काउंटरपॉइट रिसर्चमधून माहिती : तिसऱ्या तिमाहीत नफा कमाईत भारत दुसऱ्या स्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा स्मार्टफोन बाजार तिसऱ्या तिमाहीत नफा कमाईच्या बाबतीत जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि मूल्याच्या बाबतीत तिसरा सर्वात मोठा म्हणून उदयास आला आहे. काउंटर पॉइंट रिसर्चमधून ही माहिती मिळाली आहे.
तिसऱ्या तिमाहीत जागतिक स्मार्टफोन शिपमेंटमध्ये भारताचा वाटा 15.5 टक्के होता, जो चीनच्या 22 टक्के वाटा खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेनंतर भारताचा 12 टक्के वाटा आहे.
चीन अग्रस्थानावर
मूल्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत त्याचा वाटा 12.3 टक्के आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 12.1 टक्के होता. एकूण विक्रीत 31 टक्के वाटा घेऊन चीनने आपले स्थान कायम ठेवले असून 19 टक्के वाटा घेऊन अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे.
काय म्हणाले शाह
स्मार्टफोन मार्केटमध्ये भारताच्या वाढत्या वाटाबाबत, काउंटरपॉईंट रिसर्चचे सह-संस्थापक नील शाह म्हणाले, ‘1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतात, 69 कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहेत. जरी ते कमी प्रवेशयोग्य देशांमध्ये असले तरीही, भारत अजूनही सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे.
प्रिमियमायझेशनच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये मूल्यवर्धनासाठी भरपूर वाव आहे कारण बरेच वापरकर्ते त्यांच्या तिसऱ्या किंवा चौथ्या फोनवर अपग्रेड करत आहेत.
ते म्हणाले की, मूल्याच्याबाबतीत भारत आता चीननंतर दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे आणि मूल्याच्या बाबतीत चीन आणि अमेरिकेनंतर भारताचे स्थान तिसरे आहे.