For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुरुष कबड्डीत भारताची कोरियावर मात

06:43 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुरुष कबड्डीत भारताची कोरियावर मात
Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धा : रोशिबिनाचे पदक निश्चित, मिश्र्र सांघिक नेमबाजीत इलावेनिल-पार्थ यांना चौथे स्थान

Advertisement

वृत्तसंस्था, नागोया :

भारताची नेमबाज जोडी इलावेनिल वलरिवन आणि पार्थ माने यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफल मिश्र्र सांघिक अंतिम फेरीत चौथे स्थान मिळवले. पात्रता फेरीत दमदार कामगिरी केल्यानंतर अंतिम फेरीत मात्र भारतीय जोडीला तोच वेग कायम ठेवता आला नाही. पुरुष कबड्डी भारताने दक्षिण कोरियावर विजय मिळविला तर वुशूमध्ये रोशिबिना देवीने उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले आहे.

Advertisement

वलरिवन आणि माने यांनी यापूर्वी स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारांत रौप्यपदक पटकावले आहे. मात्र चीन, दक्षिण कोरिया आणि जपानच्या जोड्यांसमोर भारतीय जोडीला आव्हान निर्माण करता आले नाही. संपूर्ण अंतिम फेरीत भारत पिछाडीवर राहिला आणि 376.3 गुणांसह चौथ्या स्थानावर स्पर्धेतून बाहेर पडला. चीनच्या वांग झिफेई आणि शेंग लिहाओ या जोडीने 507.1 गुणांसह सुवर्णपदक जिंकताना विश्वविक्रमाची नोंद केली. दक्षिण कोरियाच्या बान ह्ये-जिन आणि पार्क हा-जुन यांनी 502.9 गुणांसह रौप्यपदक मिळवले. जपानच्या नाओकी हानाकावा आणि मिसाकिया नोबाटा यांनी 439.7 गुणांसह कांस्यपदक पटकावले. दरम्यान, पार्थ मानेने यापूर्वी भारतीय पुऊषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक संघाचा भाग म्हणून रौप्यपदक, तसेच पुऊषांच्या वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

वुशू या क्रीडा प्रकारात महिलांच्या 60 किलो वजन गटात भारताच्या रोशिबिना  देवीने उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत मकाऊच्या चू मॅन सिनचा पराभव केला. या स्पर्धेच्या मागील आवृत्त्यांतही तिने रौप्य व कांस्य जिंकले होते. तिलना गुणांच्या आधारे विजयी घोषित करण्यात आले. मात्र नानक्वा व नंदाओ प्रकाराच्या अंतिम फेरीत हंजाबम लँगलेटोम्बी देवीने 9.403 गुणांसह नववे स्थान मिळविले. पुरुषांच्या सांडा प्रकारात भारताच्या आर्यनाला उझ्बेकच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला.

कबड्डी : भारताचा दक्षिण कोरियावर दणदणीत विजय

गतविजेत्या भारतीय पुऊष कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली विजयी मोहीम कायम ठेवत दक्षिण कोरियाचा 63-31 असा दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने गट ‘अ’मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताने सामन्याच्या सुऊवातीपासूनच आक्रमक खेळ करत वर्चस्व गाजवले. पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताने 34-14 अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रातही भारताचा दबदबा कायम राहिला आणि भारतीय संघाने हे सत्र 29-17 असे जिंकत सामना 63-31 असा खिशात घातला. भारताला यशस्वी चढायांमधून 38 गुण, बोनस गुणांमधून 17 गुण, ऑल-आउटमधून 6 गुण आणि सुपर टॅकलमधून 2 गुण मिळाले. दक्षिण कोरियाने भारतीय खेळाडूंना बाद करून 23 गुण आणि 8 बोनस गुण मिळवले. गतविजेत्या भारताचा हा स्पर्धेतील दुसरा विजय आहे. भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात यजमान जपानचा 49-24 असा पराभव केला होता. आता भारताचा पुढील सामना बुधवारी बांगलादेशविऊद्ध होणार आहे. त्यानंतर गुऊवारी गटातील अखेरच्या सामन्यात भारताचा सामना चिनी तैपेईविऊद्ध होईल. दरम्यान, भारतीय महिला कब•ाr संघाचा गट ‘अ’मधील दुसरा सामना बुधवारी इराणविऊद्ध होणार आहे. महिलांनी सोमवारी बांगलादेशचा पराभव करत विजयी सुऊवात केली होती.

सेपकटकरॉ : भारताचा मलेशियाकडून पराभव

सेपकटकरॉच्या पुऊष सांघिक रेगू प्रकारात भारताला मलेशियाकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. सुऊवातीच्या सामन्यात भारताने चांगली झुंज दिली; मात्र त्यानंतर मलेशियाने सामन्यावर वर्चस्व मिळवत भारताचा पराभव केला. पहिल्या सामन्यात भारताने मलेशियाला कडवी टक्कर दिली. मात्र मलेशियाने 2-1 (15-13, 11-15, 15-6) असा विजय मिळवत आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला 0-2 (9-15, 12-15) असा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यातही भारताला मलेशियाविऊद्ध 11-15, 5-15 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मलेशियाने भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत सामना जिंकला. भारताने सोमवारी गट ‘ब’मधील आपल्या पहिल्या सामन्यात जपानविऊद्ध 1-2 असा पराभव स्वीकारला होता. आता भारताचा गटातील अखेरचा साखळी सामना फिलिपिन्सविऊद्ध होणार आहे.

कराटे : चेतन भट्टचे कांस्य हुकले, अलीशा पराभूत

कराटे प्रकारात भारताच्या चेतन भट्टला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. पुऊषांच्या 84 किलो वजनी कुमिते प्रकारातील कांस्यपदकाच्या प्ले-ऑफमध्ये चिनी तैपेईच्या मेंग-यू चुंगने चेतनचा सेन्शूच्या आधारावर पराभव केला. कांस्यपदकाच्या लढतीत दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक-एक युको गुण मिळवल्याने सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. मात्र चुंगने सामन्यात सर्वप्रथम गुण मिळवल्यामुळे त्याला सेन्शूचा फायदा मिळाला आणि त्याने कांस्यपदक पटकावले.

दरम्यान, महिलांच्या 55 किलो कुमिते प्रकारात भारताच्या अलीशाला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या कोक इस्त्री अगुंग सॅनिस्ट्यारानीने अलीशाचा 6-1 असा पराभव केला.

तलवारबाजी : तनिक्षा खत्रीचा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव

तलवारबाजीच्या महिला वैयक्तिक इपी प्रकारात भारताच्या तनिक्षा खत्रीने दमदार कामगिरी करत उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. मात्र या फेरीत जागतिक विजेती दक्षिण कोरियाची सॉन्ग सेरा हिच्याकडून तनिक्षाला 9-15 असा पराभव स्वीकारावा लागला. 22 वषीय तनिक्षाने यापूर्वी थायलंडच्या नत्पापट संग्नगियोचा 15-10 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. या वर्षाच्या सुऊवातीला नायजेरियात झालेल्या वरिष्ठ महिला इपी कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तनिक्षाने इतिहास रचला होता. या प्रकारातील भारताची आणखी एक तलवारबाज मितवा चौधरी हिचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. चीनच्या यांग जिंगवेनने मितवाचा 15-14 असा पराभव केला.

फॉइलमध्ये सचिन, हेमाश बाहेर

पुऊषांच्या वैयक्तिक फॉइल प्रकारात भारताच्या सचिन आणि हेमाश सिंग सनासाम यांना उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. हेमाशने पहिल्या पिरियडनंतर कझाकस्तानच्या गॅलिम नुऊमोव्हवर 6-5 अशी आघाडी घेतली होती. मात्र नुऊमोव्हने जोरदार पुनरागमन करत सामना 15-9 असा जिंकला. दुसरीकडे, भारताच्या सचिनला कझाकस्तानच्या तिमोफे सेम्यानोव्हकडून 9-15 असा पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी दोन्ही भारतीय तलवारबाजांनी प्राथमिक गट फेरीत प्रत्येकी तीन विजय आणि दोन पराभव नोंदवत अंतिम 32 खेळाडूंच्या फेरीत प्रवेश केला होता. दोघांनीही आपापल्या गटात चौथे स्थान मिळवले होते. सचिनने गट फेरीत तीन विजयांसह आपली कामगिरी पूर्ण केली.

Advertisement
Tags :

.