भारताचा अफगाणवर 7 गड्यांनी विजय
सामनावीर शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक, गुरबाजचे शतक वाया
वृत्तसंस्था, धर्मशाला
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शनिवारी येथे दिवसरात्रीच्या खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा आल्यानंतर यजमान भारताने अफगाणचा 13 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. कर्णधार शुभमन गिलने नाबाद अर्धशतक झळकावून सामनावीरचा बहुमान मिळविला. अफगाणच्या गुरबाजचे शतक वाया गेले.
या सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वीच पावसाच्या अडथळ्यामुळे खेळ बराचवेळ थांबवावा लागला. पाऊस थांबल्यानंतर पंचांनी खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना पुढे खेळविण्याचा निर्णय घेतला. पण षटकांची संख्या कमी केली. सदर सामना प्रत्येकी 25 षटकांचा खेळविला गेला.
भारताने नाणेफेक जिंकून अफगाणला प्रथम फलंदाजी दिली. अफगाणने 24.5 षटकांत सर्वबाद 194 धावा जमविल्या. अफगाणने भारताला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले. भारताने 22.5 षटकांत 3 बाद 195 धावा जमवित हा सामना 7 गड्यांनी जिंकला.
अफगाणच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. पहिल्या 5 षटकांमध्ये त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले. ब्रारने सलामीच्या इब्राहीम झेद्रानला केवळ एका धावेवर बाद केले. त्यानंतर अर्शदीप सिंगने अटलला खाते उघडण्यापूर्वी पायचीत केले. अर्शदीपने आणखी एक अफगाणला धक्का देताना रेहमत शहाला 3 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर गुरबाज आणि कर्णधार शाहीदी यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 116 धावांची शतकी भागिदारी केली. गुरबाजने 51 चेंडूत 8 षटकार आणि 8 चौकारांसह 102 धावा झळकविल्या. दुबेने कर्णधार शाहिदीला झेलबाद केले. त्याने 30 चेंडूत 3 चौकारांसह 27 धावा जमविल्या. गुरबाजला नितीशकुमार रे•ाrने त्रिफळा चीत केले. दुबेने ओमरझाईला यष्टीरक्षक इशान किसनकरवी झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 3 षटकारांसह 26 धावा जमविल्या. यानंतर अफगाणचे तळाचे फलंदाज झटपट झाले. अफगाणचे शेवटचे 6 फलंदाज 52 धावांत तंबूत परतले. भारतातर्फे हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 तर अर्शदीप सिंग व नितीशकुमार रे•ाr यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. अफगाणच्या डावात 12 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले.
भारताच्या डावाला सुरूवात झाल्यानंतर सहाव्या षटकांत रोहित शर्मा धावचीत झाला. त्याने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. शर्मा बाद झाल्यानंतर गिल आणि इशान किसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. इशान किसनने 22 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 34 धावा जमविल्या. श्रेयस अय्यर केवळ 12 धावांवर बाद झाला.
कर्णधार गिल आणि केएल राहुल यांनी विजयाचे सोपस्कार 13 चेंडू बाकी ठेवून पूर्ण केले. राहुलने 19 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 39 तर गिलने 61 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 84 धावा जमविल्या. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 53 धावांची भागिदारी केली. भारताच्या डावामध्ये 7 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे राशीद खान व झिया उर रेहमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षित धावफलक: अफगाण 24.5 षटकांत सर्वबाद 194 (गुरबाज 102, शाहीदी 27, ओमरझाई 26, अवांतर 12, ब्रार व हर्श दुबे प्रत्येकी 3 बळी, अर्शदीप सिंग आणि नितीशकुमार रे•ाr प्रत्येकी 2 बळी), भारत 22.5 षटकांत 3 बाद 195 (शुभमन गिल नाबाद 84, रोहित शर्मा 16, इशान किशन 34, श्रेयस अय्यर 12, केएल राहुल नाबाद 39, अवांतर 10, झिया उर रेहमान आणि राशिद खान प्रत्येकी 1 बळी).