For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जमैकाकडून भारत पराभूत

12:35 PM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
जमैकाकडून भारत पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

लंडनमध्ये सुरू असलेल्या युनिटी चषक पुरूषांच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. चार देशांच्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात जमैकाने भारताचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेत मर्यादीत सामने आयोजित केले असून दोन उपांत्य फेरीचे तसेच एक अंतिम फेरीचा आणि एक सामना तिसऱ्या स्थानासाठी प्लेऑफचा खेळविला जात आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात जमैकातर्फे कोर्टनी क्लार्कने 8 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. मध्यंतरापर्यंत जमैकाने भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली होती. 78 व्या मिनिटाला केहीम डिक्सनने जमैकाचा दुसरा गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत शनिवारी भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात प्लेऑफ फेरीतील तिसऱ्या स्थानासाठी सामना होईल तर नायझेरीया आणि जमैका यांच्यात अंतिम सामना खेळविला जाईल.

Advertisement
Advertisement
Tags :

.