For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

15 वर्षांखालील विश्वचषकात भारत होंडुरासकडून पराभूत

06:22 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
15 वर्षांखालील विश्वचषकात भारत होंडुरासकडून पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था, बाकू : येथे सुरू असलेल्या फिफा 15 वर्षांखालील विश्वचषक आणि महोत्सवातील ‘क’ गटाच्या 32 संघांच्या फेरीतील सामन्यात भारताला होंडुरसकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. सामन्यात डॅनियो फ्लोरेसने (18 व्या मिनिटाला) गोल करत होंडुरसला आघाडी मिळवून दिली, ज्यामुळे मध्यंतरापर्यंत ते आघाडीवर होते.

Advertisement

दुसऱ्या सत्रात रोनंदेव अहेबमने (31 व्या मिनिटाला) गोल करून भारतासाठी बरोबरी साधली, परंतु त्यानंतर लगेचच अलेहांद्रो अमायाने (36 व्या मिनिटाला) गोल करत होंडुरसला पुन्हा आघाडी मिळवून दिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्व 189 संघ आपापल्या स्थानासाठी खेळत राहणार आहेत. आता भारतीय संघ खालच्या गटातील 16 संघांच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, जिथे ते 81 ते 96 व्या स्थानांसाठी स्पर्धा करतील. भारताचा पुढचा सामना त्रिनिदाद आणि टोबॅगोविऊद्ध होईल, ज्यांना त्यांच्या 32 संघांच्या फेरीतील सामन्यात फ्रान्सकडून 2-4 असा पराभव स्वीकारावा लागला.

सामन्याच्या सुऊवातीला दोन्ही संघांकडे चेंडूवर समान ताबा होता, मात्र त्यानंतर होंडुरसने आक्रमक दबाव निर्माण करून भारताच्या चाली रोखण्यास सुऊवात केली. पहिल्या सत्रात भारताला रोनंदेव अहेबम आणि नारा मैतेई लौशंबम यांच्या माध्यमातून दोन चांगल्या संधी मिळाल्या होत्या. चौथ्या मिनिटाला रोनंदेवने पेनल्टी क्षेत्राच्या सीमेवरून मारलेला फटका क्रॉस बारच्या वरून गेला. त्यानंतर 15 व्या मिनिटाला पेनल्टी क्षेत्राच्या अगदी बाहेरून नाराने घेतलेली फ्री-किकही थोडक्यात क्रॉस बारच्या वरून गेली. मात्र होंडुरसने डॅनियो फ्लोरेसच्या गोलद्वारे खाते उघडले. 18 व्या मिनिटाला गोलरक्षक जेनीत निंगथौजमच्या चुकीच्या पासचा फायदा घेत फ्लोरेसने चेंडूवर ताबा मिळवला आणि गोल केला.

Advertisement

मध्यंतरानंतरही होंडुरसने भारतीय बचावावर दबाव कायम ठेवला. मात्र भारताच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना 31 व्या मिनिटाला यश मिळाले, जेव्हा एका वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी गोल नोंदवला. आक्रमणाची सुऊवात करताना आर. लालरेमऊआतफेलाने उजव्या बाजूला रोनंदेवला चेंडू दिला. रोनंदेवने मारलेला क्रॉस थेट गोलच्या वरच्या कोपऱ्यात जाऊन विसावला. त्यानंतर भारताने काही संधी वाया घालविल्या आणि त्याची किंमत मोजावी लागली. 37 व्या मिनिटाला होंडुरसच्या जोसुए लिनारेसने चेंडू मागे दिला. सोहिलने तो चेंडू दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने चेंडू जेनीतला लागून अलेहांद्रो अमायाच्या दिशेने गेला. अमायाने कोणतीही चूक न करता चेंडू रिकाम्या जाळीत ढकलून गोल केला.

Advertisement
Tags :

.