For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; क्रिकेटमध्ये सुवर्णपदकाची कमाई

04:58 PM Oct 03, 2026 IST | ABHIJEET RANJANE
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय  क्रिकेटमध्ये सुवर्णपदकाची कमाई
Advertisement

निशिन, जपान : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या टी-20 क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटचे सुवर्णपदक सलग दुसऱ्यांदा आपल्या नावावर केले.

Advertisement

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 20 षटकांत 6 बाद 211 धावा केल्या. अभिषेक शर्माने 28 चेंडूंत 61 धावांची आक्रमक खेळी केली, तर तिलक वर्माने अवघ्या 22 चेंडूंत नाबाद 51 धावा करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.

विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला 20 षटकांत 6 बाद 192 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून हसन नवाजने 96 धावांची झुंजार खेळी केली; मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या टप्प्यात सामना भारताच्या बाजूने झुकवला.

Advertisement

या विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांचे सुवर्णपदक जिंकले आहे.

पदक वितरण सोहळ्यात जय शाह उपस्थित

भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यानंतर झालेल्या पदक वितरण सोहळ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह उपस्थित होते. भारतीय संघाला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

Advertisement
Tags :

.