महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषक भारताची न्यूझीलंडवर मात

06:45 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ सांतियागो

Advertisement

कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील 9 वे ते 16 वे स्थान ठरविण्यासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा सडन डेथ पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. .निर्धारित 60 मिनिटांत दोन्ही संघांमध्ये 3-3 अशी बरोबरी राहिली. त्यात रोपनी कुमारी (8 वे मिनिट), ज्योती छत्री (17 वे मिनिट) आणि सुनीलिता टोप्पो (53 वे मिनिट) यांनी भारताकडून प्रत्येकी एक गोल केला, तर इसाबेला स्टोरी (11 वे मिनिट), मॅडलिन हॅरिस (14 वे मिनिट) आणि रियाना फो (49 वे मिनिट) यांनी न्यूझीलंडसाठी गोल केले.

Advertisement

पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने 3-2 असा विजय मिळवला. साक्षी राणा आणि प्रीती यांनी भारतासाठी संधीचे ऊपांतर केले, तर मुमताज खानने सडन डेथमध्ये गोल केला. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या हॅना कॉटर आणि रियाना फो यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये त्यांच्या फटक्यांचे गोलात ऊपांतर केले. न्यूझीलंडच्या बचावफळीवर सतत दबाव आणून आणि त्यांच्या हद्दीत झपाट्याने प्रवेश करत भारताने खेळाची सुऊवात दमदार पद्धतीने केली. न्यूझीलंडने केलेल्या प्रतिहल्ल्याच्या प्रयत्नांना न जुमानता भारताने आपला वेग कायम राखला आणि सुऊवातीलाच पेनल्टी कॉर्नरचे रोपनी कुमारीने केलेल्या यशस्वी रूपांतराद्वारे आघाडी घेतली. दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्याशी आज गुऊवारी भारत खेळेल. हा 9 वे ते 12 वे स्थान ठरविण्यासाठीचा सामना असेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article