महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारताची अमेरिकेवर मात

06:10 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिला प्रो हॉकी लीग : 3-1 गोलफरकाने विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisement

भारतीय महिला हॉकी संघाने निर्दोष खेळाचे प्रदर्शन करीत महिला प्रो हॉकीमधील शेवटच्या सामन्यात अमेरिकेवर 3-1 असा विजय मिळविला.

वंदना कटारिया (9 वे मिनिट), दीपिका (26 वे मिनिट), सलिमा टेटे (56 वे मिनिट) यांनी भारताचे गोल नोंदवले तर सॅने कार्ल्सने (42 वे मिनिट) अमेरिकेचा एकमेव गोल नोंदवला. भारताने प्रारंभीच पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळविली होती. पण दीपिकाचा ड्रॅगफ्लिक पोस्टच्या फार दुरून बाहेर गेला. अमेरिकेलाही नंतर एक संधी मिळाली. पण गोलरक्षक सविता पुनियाने त्यांचा प्रयत्न फोल ठरविला. पण भारताला लवकरच आघाडी घेण्याची संधी मिळाली. संगीता कुमारीने उजव्या विंगेतून आगेकूच करीत सोनियाकडे चेंडू सोपवण्याचा प्रयत्न करताना चेंडू अमेरिकन गोलरक्षक कीलसी रॉबल्सला लागून रिबाऊंड झाला. त्यावर ताबा घेत वंदना कटारियाने चेंडू गोलपोस्टमध्ये मारला. दुसऱ्या सत्रात मोनिकाने वंदनाकडे पास पुरविल्यानंतर तिने तो दीपिकाकडे सोपविला. तिने रिव्हर्स स्विंग करीत भारताची आघाडी 2-0 अशी केली.

तिसऱ्या सत्रात अमेरिकेने गोल नोंदवून भारताची आघाडी कमी केली. पण शेवटच्या सत्रात सलिमा टेटेने संघाचा तिसरा गोल नोंदवत भारताचा विजयही निश्चित केला. भारताची पुढील लढत चीनविरुद्ध 12 फेब्रुवारी रोजी राऊरकेला येथे होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social-media#sports
Next Article