For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडिया ब संघाला 240 धावांची आघाडी

06:17 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंडिया ब संघाला 240 धावांची आघाडी
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

2024 च्या क्रिकेट हंगामातील सुरु झालेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर इंडिया ब संघाने इंडिया अ संघावर 240 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे.

या सामन्यात इंडिया ब संघाचा पहिला डाव 321 धावांवर आटोपल्यानंतर इंडिया अ संघाने पहिल्या डावात 231 धावा जमविल्या. इंडिया अ संघाने 2 बाद 134 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा डाव 231 धावांवर आटोपला. इंडिया ब संघाने पहिल्या डावात 90 धावांची आघाडी घेतली. इंडिया अ संघाच्या पहिल्या डावात अगरवालने 36, कोटीयानने 32, केएल राहुलने 37 तर रियान परागने 30 धावा जमविल्या. इंडिया अ संघाला अवांतर 36 धावा मिळाल्या. इंडिया ब तर्फे मुकेशकुमार आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 3 तर साई किशोरने 2, यश दयाल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंडिया ब संघाने दुसऱ्या डावात 6 बाद 150 धावांपर्यंत मजल मारत एकूण 240 धावांची आघाडी घेतली आहे. इंडिया ब च्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने 47 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 61 तर सरफराज खानने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 46 धावा जमविल्या. इंडिया अ तर्फे खलिल अहमद, आकाशदीप यांनी प्रत्येकी 2 तर आवेश खान आणि कोटियान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यातील खेळाचा एक दिवस बाकी असून इंडिया ब संघाची स्थिती समाधानकारक आहे.

Advertisement

संक्षिप्त धावफलक : इंडिया ब प. डाव सर्व बाद 321, इंडिया अ प. डाव सर्व बाद 231, इंडिया ब दु. डाव 31.3 षटकात 6 बाद 150 (ऋषभ पंत 61, सरफराज खान 46, खलिल अहमद व आकाशदीप प्रत्येकी 2 बळी, आवेश खान व कोटीयान प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.