भारत-ऑस्ट्रेलिया महिला वनडे मालिका आजपासून
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी ऑस्ट्रेलियन महिलांविऊद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी आत्मविश्वास आणि आशावाद व्यक्त केला आहे आणि भारताच्या ऐतिहासिक एकदिवसीय विश्वचषक विजयानंतर हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटल आहे.
मंगळवारच्या मालिकेच्या सुऊवातीच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना मुझुमदार यांनी संघाचे लक्ष्य आणि महत्त्वाकांक्षा अधोरेखित केली. ‘खेळाडू विजयासाठीच खेळतात. खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक कर्मचारी असतात. आमचे ध्येय हेच आहे, विश्वविजेते बनणे. विश्वचषक विजयानंतरची ही पहिली मालिका आहे. त्यामुळे ती खूप महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियात येऊन खेळण्यासाठी या मैदानापेक्षा चांगले ठिकाण दुसरे काहीही नाही. आम्ही या एकदिवसीय मालिकेची वाट पाहत आहोत’, असे ते म्हणाले.
विश्वचषक विजयानंतर भारतीय महिलांचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असून ऑस्ट्रेलियन भूमीवर यजमान संघाविऊद्ध त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ऑस्ट्रेलियन महिलांविऊद्धच्या सामन्यांपूर्वी लवकर आगमनाचे आणि हवामानाशी जुळवून घेण्याचे महत्त्व देखील मुझुमदार यांनी अधोरेखित केले. मालिकेपूर्वी आगमन केल्याने खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यास मदत होते यावर त्यांनी भर दिला. ‘मला वाटते की, कोचिंग स्टाफचा विचार करता हे खूप महत्वाचे आहे. गेल्या वर्षी आम्ही इंग्लंडला गेलो तेव्हा आम्ही हे पाहिले होते. आम्ही मालिकेच्या 10 दिवस आधी गेलो होतो आणि त्यानंतर आम्हाला इंग्लंडमध्ये अपेक्षित निकाल मिळाले. मला वाटते की., परदेशात जाऊन शक्य तितक्या लवकर तेथील हवामानाशी जुळवून घेणे आणि खेळात उतरणे खूप महत्वाचे आहे’, असे त्यांनी सांगितले.
नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवून टी-20 मालिका संस्मरणीयरीत्या जिंकली होती. पहिल्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
भारताचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्रीचरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष, काश्वी गौतम, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, उमा चेत्री, हरलीन देओल, प्रतीका रावल.