For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉकीच्या उपांत्य फेरीत आज भारत - पाक आमनेसामने

06:10 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
हॉकीच्या उपांत्य फेरीत आज भारत   पाक आमनेसामने
Advertisement

वृत्तसंस्था, काकामिगहारा :

Advertisement

गतविजेता भारत आज गुऊवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्याद्वारे पुऊष आंतरराष्ट्रीय हॉकीमधील सर्वांत मोठी पारंपरिक लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार असून, भारताचे मुख्य लक्ष्य 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवणे हे आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघाला लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळेल आणि भारत ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमावण्याच्या मनस्थितीत नाही. दुसरी उपांत्य फेरी मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात खेळली जाईल. या वर्षाच्या सुऊवातीला झालेल्या विश्वचषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागल्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. भारताने ‘गट अ’मधील पाचही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे.

Advertisement

त्यांच्या मोहिमेची सुऊवात इंडोनेशियावर 13-1 अशा विजयाने झाली, त्यानंतर श्रीलंकेचा 16-1 असा पराभव केला. त्यानंतर भारताने दक्षिण कोरियावर 8-2 असा विजय मिळवला आणि यजमान जपानविऊद्ध 2-0 असा विजय नोंदवला. जपानविऊद्धचा सामना हा गट टप्प्यातील त्यांचा सर्वांत कठीण सामना ठरला, तर दक्षिण कोरियाविऊद्धचा विजय आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील त्या संघाविऊद्धचा भारताचा सर्वोत्तम विजय ठरला. भारताने बांगलादेशवर 10-0 असा दणदणीत विजय मिळवून गट फेरीचा समारोप केला.

संपूर्ण स्पर्धेत भारताची कामगिरी अत्यंत प्रभावी राहिली असून त्यांच्या आक्रमक फळीलाही योग्य वेळी सूर गवसला आहे. आघाडीपटू दिलप्रीत सिंग नऊ गोलांसह सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा सहकारी अभिषेक आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी आठ गोल केले आहेत, तसेच पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतचे ‘ड्रॅग-फ्लिक्स’ प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. संघाच्या शेवटच्या गट सामन्यादरम्यान डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे मिडफील्डर राजकुमार पाल स्पर्धेतून बाहेर पडला आहे, त्यामुळे भारताला त्याच्याशिवाय खेळावे लागेल. त्याच्या जागी राखीव खेळाडू म्हणून सोबत असलेल्या निलकांता शर्माचा संघात समावेश केला जाईल.

Advertisement
Tags :

.