For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-अमेरिकेची ध्येये समसमानच

07:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत अमेरिकेची ध्येये समसमानच
Advertisement

एस. जयशंकर यांची सर्जियो गोर यांच्याशी चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांच्यात भारत-अमेरिका संबंध आणि संभाव्य व्यापार करार यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. दुर्मिळ खनिजांसंबंधीच्या मंत्री परिषदेत सहभागी होण्यासाठी जयशंकर लवकरच अमेरिकेचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा महत्वाची मानली जात आहे. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी त्यांचे संदेश प्रसारित केले आहेत.

Advertisement

आमच्या चर्चेत अनेक द्विपक्षीय, आंतरराष्ट्रीय आणि अर्थविषयक मुद्द्यांवर बोलणी करण्यात आली. भारत आणि अमेरिका यांची ध्येये समसमानच असून आम्ही त्यांची पूर्तता करण्यासाठी एकमेकांचा अधिक जवळ येत आहोत, असा दोन्ही नेत्यांनी प्रसारित केलेल्या संदेशाचा गर्भितार्थ आहे. या चर्चेत संरक्षण, दुर्मिळ खनिजे आणि भारत-अमेरिका व्यापार या मुद्द्यांवरही भर देण्यात आला होता, अशी माहिती दिली गेली आहे. ही चर्चा अत्यंत सघन स्वरुपाची झाली, असे दोघांनीही स्पष्ट केले आहे.

पुढच्या आठवड्यात दौरा

जयशंकर हे पुढच्या आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. अमेरिकेच्या पुढाकाराने दुर्मिळ खनिजांच्या संदर्भात एका उच्चस्तरीय मंत्री पातळीवरील बैठकीच आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जयशंकर भाग घेणार आहेत. त्या निमित्ताने ते अमेरिकेतील महत्वाच्या नेत्यांशीही बोलणी करण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापार कराराची चर्चा अद्यापही होत आहे. जयशंकर यांच्या या दौऱ्यामुळे त्या चर्चेला अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचा अमेरिकेशी करार येत्या काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. भारताने नुकताच युरोपियन महासंघाशी मुक्त व्यापार करार केला आहे. तो करारही आणखी काही महिन्यांमध्ये लागू होऊ शकतो. भारताची इच्छा अमेरिकेशीही असा करार करण्याची आहे. मात्र, अद्याप काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. सर्व मतभेद दूर झाल्यानंतरच एक सर्वंकष करार करण्यात येईल, असे भारताने स्पष्ट केले असून कराराच्या पूर्ततेला वेळेचे बंधन नाही, हे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.