महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘इंडिया’ आघाडीची बुधवारी दिल्लीत बैठक

06:27 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चौथी बैठक : खर्गे यांनी सर्व 28 पक्षांच्या नेत्यांना दिल्लीत बोलावले, पाच राज्यांच्या निवडणूक निकालांवर चर्चा अपेक्षित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी 6 डिसेंबरला नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबाबत व आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे.

‘इंडिया’ आघाडीतील सहकारी पक्षांना मल्लिकार्जुन खर्गे यांनी फोन करुन बैठकीस हजर राहण्याविषयी आमंत्रण दिले आहे. त्यांनी द्रविड मुन्नेत्र कडघम आणि तृणमूल काँग्रेससह इतर आघाडीतील सहकाऱ्यांना फोन करुन बैठकीचे निमंत्रण दिले आहे. सदरच्या बैठकीत सध्याच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनितीबाबत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष भाजपला पराभूत करण्याबाबत महत्त्वाची चर्चा केली जाणार असून या कार्यक्रमाच्या रुपरेषेला अंतिम स्वरुप दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षांची ही बैठक मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा व मिझोराम या राज्यातील निवडणुकीतील निकालानंतर आयोजित करण्यात आली आहे.

लोकसभेला भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा मुकाबला करण्यासाठी 26 विरोधी पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका पटना, बेंगळूर व मुंबई येथे झाल्या आहेत. आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची मागच्या काही दिवसात मुंबईत भविष्यातील कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत तयारी करण्याबाबत 14 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. आघाडीबाबत आगामी काळात निर्णय घेण्याचे कार्य या समितीकडे असेल. आता दिल्लीतील बैठकीला या समन्वय समितीतील सर्व नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

चार राज्यांच्या निकालांचा ‘इंडिया’ आघाडीवर परिणाम

चार राज्यांच्या निकालाचा परिणाम ‘इंडिया’ आघाडीवर होऊ शकतो, असे मानले जात आहे. तृणमूल काँग्रेस, आप आणि सपासह काही पक्ष जागावाटपाबाबत लवकर चर्चेची मागणी करत आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे गेले काही दिवस इंडिया आघाडीची बैठक लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न सोयीस्करपणे करण्यात आले. आता निकाल जाहीर झाले असून यामध्ये इंडियामधील घटकपक्षांना चमकदार कामगिरी करता आलेली नाही. साहजिकच या निकालांचा परिणाम जागावाटप किंवा अन्य चर्चांवर होऊ शकतो.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article