महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा भारतावर आरोप

07:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संघीय निवडणुकांप्रकरणी आयोगाकडून चौकशी  : चीन, पाकिस्तानबद्दलही संशय

Advertisement

वृत्तसंस्था /ओटावा

Advertisement

भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेल्या राजनयिक तणवादरम्यान एक कॅनेडियन समिती तेथील संघीय निवडणुकांमधील भारताच्या भूमिकेची चौकशी करणार आहे. 2019 आणि 2021 मध्ये कॅनडात झालेल्या संघीय निवडणुकांमध्ये विदेशी हस्तक्षेपाची चौकशी करत असलेल्या आयोगाने सरकारला भारताशी निगडित माहिती प्रदान करण्यास सांगितले आहे. संघीय निवडणुकांमध्ये भारताच्या भूमिकेची चौकशी करण्याचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे, कारण मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा भारत सरकार आणि निज्जरच्या हत्येमधील दुवे शोधून काढत याप्रकरणी तपास करत असल्याचे ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत बोलताना म्हटले होते. 2019 आणि 2021 च्या निवडणुकांमध्ये भारताकडून कथित हस्तक्षेपाशी संबंधित माहिती असणारे दस्तेएवज मिळावेत, असे आयोगाने कॅनडाच्या सरकारला सांगितले आहे. क्यूबेकच्या न्यायाधीश मेरी-जोसी हॉग याच्या नेतृत्वातील या आयोगाची स्थापना संघीय निवडणुकांमध्ये विदेशी हस्तक्षेपाविषयी खुलासा करण्यासाठी करण्यात आली होती. या निवडणुकांमध्ये सत्तारुढ लिबरल पार्टीच्या बाजूने चीनने हस्तक्षेप केला होता, असा आरोप आहे. हा आयोग या मुद्द्यांसंबंधी संघीय सरकारकडून प्राप्त माहितीची पडताळणी करणार आहे. तसेच याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईंचे आकलन करत स्वत:चा अहवाल तयार करणार आहे. 3 मे 2024 पर्यंत चौकशी पूर्ण करत 31 डिसेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर केला जाण्याची अपेक्षा आहे.

विदेशी हस्तक्षेपाप्रकरणी चौकशी

आयोगाने डिसेंबर महिन्यात याप्रकरणाच्या चौकशीत भारतासंबंधीचा पैलू सामील केला होता. तसेच एक स्वतंत्र समिती स्थापन करत कॅनडामधील भारतीय समुदायावर असलेल्या विदेशी हस्तक्षेपाच्या प्रभावाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. चौकशीदरम्यान जस्टिस फॉर ऑल कॅनडा नावाचा समूह सामील करण्यात आला असून तो कॅनडात भारतीय स्थलांतरित समुदायाच्या बाजूने भूमिका मांडत असतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article