महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडिया अ चा 186 धावांनी मोठा विजय

06:26 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अनंतपूर

Advertisement

2024 च्या क्रिकेट हंगामातील रविवारी येथे झालेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात इंडिया अ संघाने इंडिया ड संघाचा 186 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात इंडिया ड संघातील फलंदाज रिकी भुईचे शतक वाया गेले. या सामन्यात इंडिया अ ने पहिल्या डावात 290 धावा जमविल्यानंतर इंडिया ड चा पहिला डाव 183 धावांत आटोपल्याने इंडिया अ ने 107 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर इंडिया अ ने आपला दुसरा डाव 3 बाद 380 धावांवर घोषित करुन इंडिया ड ला निर्णायक विजयासाठी 488 धावांचे कठीण आव्हान दिले. इंडिया ड चा दुसरा डाव 82.2 षटकात 301 धावांवर आटोपला. इंडिया ड संघातील रिकी भुईने शानदार शतक झळकाविले पण ते वाया गेले. त्याने 195 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह 113 धावा झळकाविल्या. भूईने यश दुबेसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 100 धावांची भागिदारी केली. यश दुबेने 37 धावा जमविल्या. दुबे चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्यानंतर पुढील षटकात मुलानीने पडीकलला त्रिफळाचीत केले. मुलानीने श्रेयस अय्यर आणि सॅमसन यांचे बळी मिळविले. मुलानीला या सामन्यात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. सौरभकुमारने 22 तर हर्षित राणाने 24 धावा केल्या. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात इंडिया अ चा संघ 6 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आता इंडिया अ चा पुढील सामना 19 सप्टेंबरला खेळविला जाणार आहे. इंडिया ब संघ 7 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement

संक्षिप्त धावफलक - इंडिया अ प. डाव 290, इंडिया ड प. डाव 183, इंडिया अ दु. डाव 3 बाद 380 डाव घोषित, इंडिया ड दु. डाव 82.2 षटकात सर्व बाद 301 (भूई 113, श्रेयस अय्यर 41, संजू सॅमसन 40, मुलानी 3-117, कोटीयान 4-73).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article