For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-अ महिला संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

06:36 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत अ महिला संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Advertisement

वृत्तसंस्था/ क्विन्सलॅन्ड

Advertisement

भारत-अ महिला संघ ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात विविध मालिका खेळविल्या जाणार आहेत. या मालिका ऑस्ट्रेलियामधील क्विन्सलॅन्ड होणार आहे. या मालिकांसाठी ऑस्ट्रेलियन महिला अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियन अ संघामध्ये ताहिला मॅकग्रा, किम गॅरेथ, मेगान स्कूट, तायला व्हॅलेमेनिक यांचा समावेश आहे. ब्रिस्बेनमध्ये भारत अ महिला संघाच्या दौऱ्याला टी-20 मालिकेने प्रारंभ होत आहे. यानंतर उभय संघात तीन वनडे सामने मॅके येथे खेळविले जातील. तर गोल्डकोस्ट येथे उभय संघांत चार दिवसांचा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व ताहिला मॅकग्राकडे टी-20 आणि वनडे मालिकेसाठी राहिल तर चार दिवसांच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व अष्टपैलु नॉटकडे सोपविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.