इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ महिला संघ घोषित
हरलीन, प्रतीका आणि सातघरे यांचा समावेश
वृत्तसंस्था / मुंबई
इंग्लडंविरुद्धच्या महिलांच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी आपल्या खेळाला अधिक धार देण्याची संधी हरलीन देओल, प्रतीका रावल आणि सायली सातघरे यांना मिळणार आहे. कारण या तिघींचाही इंग्लंड संघविरुद्ध खेळल्या जाणऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मलिकेसाठी भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लडमध्ये होणाऱ्या वनडे संघाचे नेतृत्व हरलीन देओल करेल तर टी-20 संघाची धुरा अनुष्का शर्माच्या खांद्यावर असेल. विशेष फलंदाज असलेल्या देओल आणि रावल तसेच वेगवान गोलंदाज सातघरे यांना टी-20 विश्वचषकसाठीच्या भारताच्या मुख्य संघात स्थान मिळवता आले नव्हते. मात्र 10 ते 13 जुलै दरम्यान लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात या सर्व खेळाडू प्रत्यक्ष मैदानात खेळताना दिसतील.
भारताचे टी-20 वेळापत्रक
पहिला टी-20 - 20 जून, नॉर्दम्प्टन
दुसरा टी-20 - 23 जून, नॉर्दम्प्टन
तिसरा टी-20- 25 जून, चेम्सफोर्ड
भारताचे एकदिवसीय वेळापत्रक
पहिला वनडे - 28 जून, होव
दुसरा वनडे- 1 जुलै, टाँटन
तिसरा वनडे-4 जुलै, टाँटन
इंग्लंड अ विरुद्ध टी-20 साठी भारत अ संघ
अनुष्का शर्मा (कर्णधार), वृंदा दिनेश (उपकर्णधार), जी कमलिनी, उमा चेत्री, वैष्णवी शर्मा, प्रेमा रावत, पूर्वजा वेर्लेकर, जिंतीमणी कलिता, सायमा ठाकोर, सिमरन बहादुर, श्वेता सेहरावत, दीया यादव, मिन्नू मणी, शबनम शकील, तनुजा कंवेर.
इंग्लंड अ विरुद्धच्या वनडेसाठी भारत अ संघ
हरलीन देओल, (कर्णधार), प्रतीका रावल (उपकर्णधार), प्रिया पुनिया, तनिषा सिंग, जी कमलिनी, तेजल हसबनीस, निकी प्रसाद, प्रेमा रावत, तनुजा कंवर, वैष्णवी शर्मा, शबनम शकील, सायली सातघरे, जिंतीमणी कलिता, सायमा ठाकोर.