टी-20 विश्वचषक सराव सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 पूर्वीच्या दोन सराव सामन्यांसाठी भारत ‘अ‘ संघाची घोषणा केली आहे. आयुष बडोनी भारत ‘अ‘ संघाचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे, विश्वचषकासाठी वरिष्ठ पुरुष संघात असलेल्या आणि अलीकडेच शस्त्रक्रिया केलेल्या तिलक वर्माचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत ‘अ‘ संघ टी-20 विश्वचषकातील त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात 2 फेब्रुवारी रोजी अमेरिकेशी खेळणार आहे. त्यानंतर आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील संघ या प्रतिष्ठित स्पर्धेतील त्यांच्या दुसऱ्या सराव सामन्यात 6 फेब्रुवारी रोजी नामिवियाशी भिडणार आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ पुरुष संघही त्यांच्या टी-20 विश्वचषक 2026 मोहिमेपूर्वी एक सराव सामना खेळणार आहे. ते 4 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेशी खेळतील.
भारत संघ : आयुष बडोनी (कर्णधार), नमन धीर, आशुतोष शर्मा, प्रियांश आर्य, एन.जगदीशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रियान पराग, मानव सुतार, अशोक शर्मा, उर्विल पटेल (यष्टीरक्षक), गुरजपनीत सिंग, विप्राज निगम, रवी बिश्नोई, खलील अहमद, मयंक यादव.