युरोप दौऱ्यासाठी इंडिया अ हॉकी संघ जाहीर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी युरोपच्या दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने मंगळवारी येथे इंडिया अ पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. युरोपच्या दौऱ्यामध्ये इंडिया अ हॉकी संघ 8 सामने खेळणार आहे. सदर दौरा 8 ते 20 जुलै दरम्यान होणार आहे. भारतीय हॉकीपटूंना विदेशी दौऱ्याचा अनुभव होण्याच्या हेतुने हे सामने आयोजित केले आहेत.
युरोपच्या दौऱ्यामध्ये इंडिया अ हॉकी संघ फ्रान्स, नेदरलँड्स आणि आयर्लंड बरोबर प्रत्येकी दोन सामने तसेच इंग्लंड आणि बेल्जियमबरोबर प्रत्येकी 1 सामना खेळणार आहे. हॉकी इंडिया 20 सदस्यांचा इंडिया अ हॉकी संघ निवडला आहे. या दौऱ्यातील इंडिया अ संघाचा पहिला सामना आयर्लंडबरोबर 8 जुलैला होईल.
इंडिया अ हॉकी संघ: गोलरक्षक-पवन मोहीत शशिकुमार, बचावफळी- प्रताप लाक्रा, वरुण कुमार, अमनदीप लाक्रा, प्रमोद, संजय (कर्णधार), मध्यफळी- पी. चंदुरा बॉबी, मोहम्मद मुसेन, एम. रवीचंद्र सिंग, विष्णूकांत सिंग, प्रदीप सिंग, राजेंद्र सिंग, आघाडीफळी- अंगडबीर सिंग, बॉबीसिंग धामी, मनिंदरसिंग, व्यंकटेश केंची, आदित्य लठ्यो, सेल्वम कार्थी, उत्तम सिंग.