For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुलकच्या बैठकीत ‘अविनाशी हास्यटीका’ कार्यक्रम उत्साहात

06:22 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बुलकच्या बैठकीत ‘अविनाशी हास्यटीका’ कार्यक्रम उत्साहात
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बुलकच्या बैठकीत बेळगावचे कवी अविनाश ओगले यांच्या कवितांवर आधारित ‘अविनाशी हास्यटीका’ हा कार्यक्रम भालचंद्र कुंटे व पुष्कर ओगले यांनी सादर केला. प्रारंभी म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले व पायलट कॅ. स्मिथ मच्छार यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी भालचंद्र कुंटे म्हणाले, अविनाशमुळे आमचे क्षण समृद्ध झाले. त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या साहित्यिक विश्वाची वाटचाल अपुरी राहिली. पण त्यांचे साहित्य रसिकांसमोर यावे यासाठी हा उपक्रम केला आहे. यावेळी त्यांनी व पुष्कर ओगले यांनी भूगोलाच्या बाई, महागाई, पोस्ट वूमन, कंट्रोल झेड, हात येथून जोडतो, तसेच चषक माझा या विडंबन संग्रहातील काही चारोळ्या सादर केल्या.

Advertisement

किशोर काकडे यांनी स्वागत केले. अस्मिता देशपांडे यांनी अविनाश ओगले यांच्या ‘वाच पुस्तके’ या कवेतेचा फलक ग्रंथालयासाठी दिला. पाहुण्यांचा सत्कार जगदीश कुंटे यांनी केला. वाच पुस्तके या अविनाश यांच्या कवितेने पुष्कर ओगले यांनी सांगता केली

Advertisement
Tags :

.