आचरा वरचीवाडीसाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर कार्यान्वित
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिलेला शब्द केला पूर्ण
आचरा प्रतिनिधी
आचरा वरचीवाडी भागात वीज समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ ट्रान्सफार्मर साठी आग्रही होते. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दोन महिन्यापूर्वी ग्रामस्थांना समस्या निराकरणाबाबत शब्द दिला होता. तो पाळत शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून आचरा वरचीवाडी भागासाठी ट्रान्स्फार्मर उपलब्ध करून दिला. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.याचा शुभारंभ सोमवारी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत आचरा सरपंच जेराॅंन फर्नांडिस यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला . यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे,दिपक पाटकर, उपसरपंच संतोष मिराशी,माजी सरपंच डॉ प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, मनोज हडकर ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, किशोरी आचरेकर यांसह अभिजीत सावंत बाबू कदम, रुपेश हडकर किशोर आचरेकर गणेश गोवेकर व इतर वरचीवाडीतील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.