For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

IND vs NZ, 3rd T20I: भारताचा न्यूझीलंडवर 6 विकेट्सने विजय; मालिकेत 3-0 अशी आघाडी!

04:03 PM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
ind vs nz  3rd t20i  भारताचा न्यूझीलंडवर 6 विकेट्सने विजय  मालिकेत 3 0 अशी आघाडी
Advertisement
वेलिंग्टन : भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 6 विकेट्सने पराभव केला. अभिषेक शर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने 199 धावांचे लक्ष्य अवघ्या 13.2 षटकांत पूर्ण केले. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.

अभिषेक शर्माची वादळी खेळी

भारताच्या विजयाचा शिल्पकार सलामीवीर अभिषेक शर्मा ठरला. त्याने अवघ्या 38 चेंडूंमध्ये 113 धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर प्रचंड दबाव निर्माण झाला. वैभव सूर्यवंशीनेही 19 चेंडूंत 45 धावा करत भारताच्या धावसंख्येला वेग दिला.

Advertisement

न्यूझीलंडची 198 धावांची मजल

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 198 धावा केल्या. डॅरिल मिचेलने 52 चेंडूंमध्ये नाबाद 89 धावांची खेळी केली, तर फिन ॲलनने 25 चेंडूंमध्ये 40 धावा जोडल्या. बेवन जेकब्सनेही नाबाद 39 धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

मालिकेत भारताची 3-0 अशी आघाडी

199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अभिषेक शर्माच्या तुफानी फलंदाजीमुळे भारताने सामना सहज जिंकला. या विजयाने भारतीय संघाने मालिकेवर आपली पकड मजबूत केली असून, उर्वरित 2 सामन्यांकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.