महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सत्ताधारी, विरोधकांचा राज्याच्या अपयशात समान वाटा : सरदेसाई

12:36 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : गोवा मुक्तीदिनानिमित्त गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी त्यांच्या निवासस्थानी गोवा फॉरवर्ड पक्षाचे पदाधिकारी, फातोर्डा फॉरवर्डचे नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सरदेसाई म्हणाले की, राज्याच्या अपयशात विरोधक आणि सत्ताधारी या दोघांचाही समान वाटा आहे. गोवा हा मजबूत ब्रँड असला, तरी गोव्याच्या लोकांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे, जे गोवा मुक्तीच्या 62 व्या वर्षात राजकीय वर्गासाठी एक महत्त्वाचे आव्हान आहे, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले. राजकारणातील निवृत्तीचे वय हा मुद्दा एक दशकापूर्वी आपण सार्वजनिक चर्चेत आणला होता. मात्र तो त्यावेळी वादग्रस्त ठरला होता. आता हाच मुद्दा सत्ताधारी पक्षाने अंमलात आणण्याचे ठरविले आहे. तसे झाल्यास ती एका नवीन राजकीय युगाची सुऊवात ठरेल, असे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article