For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीयांचा क्रेडिट कार्ड वापराकडे वाढता कल

06:44 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीयांचा क्रेडिट कार्ड वापराकडे वाढता कल
Advertisement

मागील 5 वर्षांमध्ये वापरकर्त्यांची संख्या दुप्पट : आरबीआयच्या अहवालामधून माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आजकाल बहुतेकजण क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी पसंती दर्शवत आहेत. यामध्ये बील दरमहा व्याजदरासह भरले जाते. तसेच मोठमोठ्या मॉल्समधील खरेदी, ऑनलाईन शॉपिंगसह अन्य ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. मात्र जगाच्या तुलनेत भारतामध्येही ही संख्या दररोज वाढतच आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या पाच वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. यावरुन असेही स्पष्ट होते, की भारतीयांचा कल क्रेडिट कार्ड वापरण्याकडे अधिक राहिला आहे.

Advertisement

डिसेंबर 2024 मध्ये क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या डिसेंबर 2019 च्या तुलनेत दुप्पट झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची एकूण संख्या 10.80 कोटी झाली. 2019 मध्ये ही संख्या 5.53 कोटी होती.

आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, युपीआयला इतर देशांच्या जलद पेमेंट सिस्टमशी जोडून सीमापार पेमेंट्स वाढविण्याच्या दिशेने काम सुरु आहे. अशा लिंकेजमुळे सीमापार रेमिटन्स पेमेंट्समध्ये उच्च खर्च, कमी वेग, मर्यादित प्रवेश आणि पारदर्शकतेचा अभाव या समस्यांचे निराकरण करण्यात मदत होते. फेब्रुवारी 2023 मध्ये भारताची जलद पेमेंट्स सिस्टम (युपीआय) आणि सिंगापूर (पे नाऊ) यांना जोडण्यात आली आहे.

डेबिट कार्डची संख्या  पाच वर्षांपासून स्थिर ?

डेबिटकार्डची संख्या ही पाच वर्षांपासून स्थिर राहिली आहे. डिसेंबर 2029 मध्ये डेबिटकार्डची संख्या 80.53 कोटी होती, जी आता 99.9 कोटींच्या घरात पोहोचली आहे. याशिवाय मागील पाच वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे. डिसेंबर 2024 च्या पेमेंट्स सिस्टम्स अहवालानुसार मागील पाच वर्षात भारतात डिजिटल पेमेंट्समध्ये 6.7 पट आणि मूल्यात 1.6 पट वाढ झाल्याची नोंदही आरबीआयच्या अहवालात केली आहे.

Advertisement
Tags :

.