कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वीज बिल भरण्यासाठी ‘महापॉवर-पे’ ला वाढता प्रतिसाद

05:27 PM Dec 16, 2024 IST | Pooja Marathe
Increasing response to ‘MahaPower-Pay’ for paying electricity bills
Advertisement

सहा महिन्यांत वॉलेटद्वारे तब्बल 177 कोटींचा भरणा
वॉलेटधारकांना मिळाले 80 लाखांचे कमिशन
वीज ग्राहकांनाही सुविधा
कोल्हापू
निमशहरी व ग्रामीण भागात वीजबिल भरणे सोयीचे करण्राया तसेच छोट्या व्यावसायिकांना उत्पन्न मिळवून देण्राया महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटला प्रामुख्याने कोल्हापूर व सातारा जिह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांत 16 लाख 6 हजार 662 वीजग्राहकांनी 177 कोटी 42 लाख रुपयांच्या वीजबिलांचा वॉलेटद्वारे भरणा केला आहे. तर कमिशनपोटी वॉलेटधारकांनाही 80 लाख 33 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत 601 जणांनी ‘महापॉवर-पे’ वॉलेटच्या माध्यमातून वीजबिल भरणा केंद्र सुरु केले आहे.
ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महावितरणने स्वत?चे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे. वयाच्या 18 वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतात. हे वॉलेट मोबाईल किंवा संगणकाद्वारे वापरले जाते आणि डेबिट, क्रेडिट कार्ड व नेटबॅकिंगने रिचार्ज करण्याची ऑनलाइन सोय आहे. वीजबिल भरण्यासाठी वॉलेटधारकास प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यात येत आहे. ‘महापॉवर-पे‘ वॉलेटधारक होण्यासाठी इच्छुकांनी महावितरणच्या विभागीय, उपविभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.
‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिह्याने आघाडी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर जिह्यात सर्वाधिक 332 वॉलेटधारक असून गेल्या सहा महिन्यांत 7 लाख 15 हजार 465 ग्राहकांनी वॉलेटमधून 72 कोटी 97 लाखांचा वीजबिल भरणा केला आहे. तर वॉलेटधारकांना 35 लाख 77 हजारांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. त्यानंतर सातारा जिह्यात 5 लाख 80 हजार 944 ग्राहकांनी 58 कोटी 59 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला असून जिह्यातील 83 वॉलेटधारकांना 29 लाख 4 हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे.
सांगली जिह्यात 1 लाख 6 हजार 60 वीज ग्राहकांनी वॉलेटच्या माध्यमातून 16 कोटी 15 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. यात 79 वॉलेटधारकांना 5 लाख 30 हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले. सोलापूर जिह्यात 91 हजार 835 ग्राहकांनी वॉलेटद्वारे 12 कोटी 76 लाख रुपयांचे वीजबिल भरले. यात 51 वॉलेटधारकांना 4 लाख 59 हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे. तर पुणे जिह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील 1 लाख 12 हजार 358 ग्राहकांनी वॉलेटद्वारे 16 कोटी 96 रुपयांचा भरणा केला. यात संबंधित 56 वॉलेटधारकांना 5 लाख 61 हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले. आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या अर्जांची पडताळणी करून ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक म्हणून मंजूरी दिली जाते. त्यानंतर महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेता येतो. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर तात्काळ ‘एसएमएस‘ दिला जात आहे. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा आहे. अशा प्रकारच्या वसूलीचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जात आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article