For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडियन क्राफ्ट बाजारला बेळगावकरांचा वाढता प्रतिसाद

10:02 AM Jan 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंडियन क्राफ्ट बाजारला बेळगावकरांचा वाढता प्रतिसाद
Advertisement

बेळगाव : येथील गोवावेसजवळील खाऊ कट्ट्यासमोरील मंगल ग्राउंडवर 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या इंडियन क्राफ्ट बाजार प्रदर्शनाला बेळगावकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. संक्रांतीचे औचित्य साधून सुरू केलेल्या या प्रदर्शनात एकाच छताखाली 100 हून अधिक स्टॉल्स मांडले आहेत. त्यामध्ये भारताच्या विविध भागातील हॅन्डलूम व हॅन्डीक्राफ्ट उत्पादनांची मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये लखनवी चिकन सुट, टॉप्स, साड्या, ड्रेस मटेरियल व अनारकली, सहारनपूर फर्निचरमध्ये बेड्स, सोफासेट्स, अलमारी, डायनिंग टेबल, राजस्थानी टेराकोटा शिवाय राजस्थानी लोणची, बॉम्बे नॅपकिन, राजस्थानी मुखवास, लाखेच्या बांगड्या, बधोई कार्पेट्स, सतरंजी, डोअरमॅट, गालीचे,  मधुबनी पेंटिंग्स, सतरंजी, बनारसी, चंदेरी सिल्क साड्या, काथ्या वर्क साड्या, कलकत्ता साड्या, हैद्राबादी पर्ल व उडिसा पर्ल, बेडकव्हर, दिवान सेट, केरळ व बॉम्बे फॅन्सी ज्वेलरी, राजस्थानी मोजडी, फॅन्सी चप्पल, लेदर बॅग्स, कॉटन बॅग्स, टॉप्स, कॉटन शर्ट, टी-शर्ट, पंजाबी सूट व  फुलकारी आयटम्स, कॉटन साड्या याबरोबरच काश्मिरी सिल्क साड्या व सूट, भव्य स्टॉल्सवर शोभेच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या चिनीमातीच्या बरण्या, फ्लॉवर पॉट्स, बोनसाई प्लांट पॉट्स, फिरोजाबाद हँडमेड लॅम्प्स, जोधपूर पेंEिटग्स, शोभेच्या वस्तू, फुलपत्री, सर्व प्रकारची क्रॉकरी, नागालँड ड्राय फ्लॉवर्स, मातीची भांडी, टीव्ही, फ्रीज आणि सोफा कुशन कव्हर आदी वस्तूंचा समावेश आहे. पूजेसाठी व आवाजासाठी वेगवेगळ्या आकाराचे शंख उपलब्ध असून मुलांची खेळणी, टॉईज व एज्युकेशन टॉईज प्रदर्शनात उपलब्ध आहेत. .प्रदर्शनात अनेक वस्तूंवर भव्य सवलत दिली जात आहे. क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर खरेदीवर पाच टक्के सवलत आहे. प्रदर्शनात सर्वांना मोफत प्रवेश व पार्किंग सुविधा उपलब्ध आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.