For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विसर्जन कुंडात श्रीमूर्ती विसर्जनासाठी वाढता प्रतिसाद

11:20 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
विसर्जन कुंडात श्रीमूर्ती विसर्जनासाठी वाढता प्रतिसाद
Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेने जलप्रदूषण तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून फिरते मूर्ती विसर्जन जलकुंड वाहनांतून सुरू केले. यावर्षी महानगरपालिकेच्यावतीने 11 वाहनांतून जलकुंड फिरविण्यात आले. त्याला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका जलकुंडात जवळपास 14 ते 15 गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पाचव्या दिवशी काही जण गणेशमूर्ती विसर्जन  करतात. त्यामुळे अनेक जण जवळच असलेल्या विहिरींवर किंवा तलावांमध्ये विसर्जन करण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी दूषित होऊ शकते. त्यासाठी फिरते जलकुंड सुरू करण्यात आले होते.

Advertisement

बुधवारी दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत ही वाहने शहरात फिरविण्यात येत होती. शहरातील भाग्यनगर पाचवा क्रॉस, पहिले रेल्वेगेट, जुना पी. बी. रोड ते खासबाग येथील धाकोजी हॉस्पिटल, बसवेश्वर सर्कल खासबाग, सुभाष मार्केट हिंदवाडी, विश्वेश्वरनगर येथील बसथांबा, रामलिंखखिंड गल्ली, टिळक चौक, कणबर्गी देवस्थानकडे जाणारा रस्ता, देवराज अर्स कॉलनी येथील तलावाशेजारी, सह्याद्रीनगर येथील जलकुंभ, हिंडलगा परिसरात वाहने फिरविण्यात आली. दुपारपासून मूर्ती विसर्जित करण्यात येत होत्या. भक्तांनी जड अंत:करणाने श्रीमूर्तींचे मनपाने पाठविलेल्या जलकुंडामध्ये विसर्जन केले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असे म्हणून निरोप देण्यात आला.

Advertisement
Advertisement
Tags :

.